Ikram Akhtar Arrest News: इकराम अख्तर या बॉलिवूडमधल्या लोकप्रिय लेखकाला अटक करण्याची घटना समोर आलीय. इकराम याने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आलीय.
सलमान खानचा चित्रपट 'रेडी', टायगर श्रॉफचा 'बागी' आणि अजय देवगणचा 'प्यार तो होना ही था' यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचं लेखन इकराम अख्तर यांनी केलीय.
इकराम यांना 22 सप्टेंबर 2023 पर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावण्याच आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध सुमारे दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण
मुरादाबाद येथील बांधकाम व्यावसायिक कुलदीप कात्याल यांनी इकराम अख्तरवर 'आय लव्ह दुबई' चित्रपट बनवण्यासाठी त्याच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. पैसे घेतले पण इकराम अख्तर यांनी चित्रपट पूर्ण केला नाही.
पुढे बांधकाम व्यावयायिकाने दबाव टाकल्याने इकरामने दीड कोटी रुपयांचे चेक बिल्डरला दिले पण ते बाऊन्स झाले. यानंतर कुलदीपने 2016 मध्ये इकरामविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. हा खटल्याचा निकाल लागला असुन इकरामला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय
इकराम अख्तर यांची बॉलिवूड कारकीर्द
इकराम अख्तर हे हिंदी चित्रपट उद्योगातील पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याची 'इकराम अख्तर अॅक्टर फॅक्टर्स' नावाची एक अभिनय संस्थाही आहे.
'आय लव्ह दुबई' या चित्रपटाचं दिग्दर्शक त्यांनी केलीय. त्याचबरोबर 'रेडी', 'थँक्यू', 'नो प्रॉब्लेम', 'नई पडोसन', 'चलो इश्क लदाएं', 'जोरू का गुलाम', 'चल मेरे भाई', 'तेरा जादू चल गया' आणि 'छोटा चेतन'. तो चित्रपटांचा लेखक आहे.