IMDb Most Popular Indian Star 2022  Esakal
मनोरंजन

2022 IMDb Ranking: बॉलीवूड पडले मागे, टॉलीवूडच्या कलाकारांची बाजी...

जगभरातील IMDb च्या कोट्यवधी ग्राहकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजद्वारे हे रँकिंग निर्धारित केले गेले आहेत.

प्रणाली मोरे

2022 IMDb Ranking: IMDb ह्या चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवरील जगातल्या सर्वात प्रसिद्ध आणि अधिकृत स्रोत्राने 2022 च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा केली आहे. IMDb वर असलेल्या महिन्याला 20 कोटी विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही टॉप टेन यादी निर्धारित केली आहे. द ग्रे मॅन आणि तिरूचित्राम्बालाम ह्यासह अनेक भाषांमध्ये सफल कलाकृतींमध्ये भुमिका बजावलेला धनुष ह्या वर्षीच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. (IMDb Most Popular Indian Star 2022)

IMDb चे 2022 साठीचे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलाकार*

1. धनुष

2. आलिया भट्ट

3. ऐश्वर्या राय बच्चन

4. राम चरण तेजा

5. समंथा रूथ प्रभू

6. हृथिक रोशन

7. कियारा अडवानी

8. एन. टी. रामा राव ज्यु.

9. अल्लु अर्जुन

10. यश

2022 ची IMDb टॉप 10 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये असे कलाकार आहेत जे पूर्ण 2022 मध्ये IMDb च्या साप्ताहिक रँकिंगमध्ये सातत्याने सर्वोच्च स्थानी राहिले होते. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 20 कोटी व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूवर हे रँकिंग आधारित आहे.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

“जगभरातील लोक भारतीय सिनेमा, वेबसिरीज आणि कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी IMDb वर येतात आणि भारतीय कलाकारांची आमची टॉप 10 यादी ही जागतिक प्रसिद्धी निर्धारित करण्याचा आणि करिअरमधील मुख्य टप्पे आणि लक्षवेधी क्षण ओळखण्याचा मापदंड ठरली आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटले. “विविध क्षेत्रांमधील कलाकारांना जगभर नावाजले जाते व देशामध्ये त्यांच्या प्रतिभेच्या उंचीचे हे निदर्शक आहे.

धनुषसारख्या कलाकाराला मान्यता मिळून तो हॉलीवूड अभिनेते जसे रायन गोसलिंग आणि क्रिस इव्हान्सच्या सोबत भुमिका करताना दिसला आणि त्याबरोबर प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या RRR चित्रपटातील ज्यु,एनटीआर आणि राम चरण तेजा ह्यांचेही कौतुक केले जाते. समीक्षक आणि चाहत्यांनीही चित्रपटांमध्ये परतलेल्या ऐश्वर्या राय बच्चनचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले.”

IMDb सोबत एक्सक्लुझिव्हली बोलताना आलिया भट्टने ह्या वर्षीच्या यादीमध्ये तिचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “2022 हे माझ्यासाठी चित्रपटांसंदर्भात आत्तापर्यंतचे सर्वांत संस्मरणीय वर्ष ठरले आहे- ह्या वर्षी माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमी त्यांची ऋणी राहीन आणि आपल्या देशातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते व कलाकारांसोबत काम करणे, हा माझा गौरव आहे असे मला वाटते. IMDb हे लोकांच्या मनामधील भावना दर्शवणारे खरे माध्यम आहे आणि मला आशा आहे की, मी‌ जोपर्यंत कॅमेरासमोर असेन, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन. प्रेम आणि प्रकाश. आपल्याला परत एकदा धन्यवाद.”

ह्या वर्षीच्या सर्वांत प्रसिद्ध कलाकारांबद्दल आणखी माहिती:

• धनुष (क्र. 1) 2022 मध्ये पाच भूमिकांमध्ये झळकला; नेटफ्लिक ओरिजिनल द ग्रे मॅन, आणि तमिळ भुमिका- मारन, तिरूचित्राम्बालाम, नानेवरुवेन आणि वाती.

• एस. एस. राजामौलीच्या भव्य RRR (राईज रोअर रिवॉल्ट) मधील आघाडीचे कलाकार- आलिया भट्ट (क्र. 2), राम चरण तेजा (क्र. 4) आणि एन टी रामा राव ज्यु (क्र. 8) हे सर्व ह्या यादीमध्ये आहेत.

• भट्टने गंगुबाई काठियावाडीद्वारेही चाहत्यांचे मनोरंजन केले आणि तिने डार्लिंग्जमध्येही मुख्य भूमिका केली (जी तिची नेटफ्लिक्सवर निर्मितीसुद्धा होती), तसेच जगभर हिट झालेल्या ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवामध्ये ईशा म्हणूनही तिने भूमिका केली.

• पाच वर्षांनी सिनेमामध्ये परत येणा-या ऐश्वर्या राय बच्चनला (क्र. 3) पोनियन सेल्वन: पार्ट 1 मधील आपल्या विशेष भूमिकेमध्ये बघण्यासाठीही चाहते उत्सुक होते.

• कियारा अडवानी (क्र. 7) हिने जुगजुगजियो आणि भूलभुलैया 2 अशा दोन ब्लॉकबस्टर भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT