Ind vs Aus CWC Final Who will win the World Cup? Rajinikanth made a prediction SAKAL
मनोरंजन

Ind vs Aus CWC Final: वर्ल्डकप कोण जिंकणार? रजनीकांतने केली भविष्यवाणी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकप कोण जिंकणार याची रजनीकांत यांनी भविष्यवाणी केलीय

Devendra Jadhav

Rajinikanth prediction on Ind vs Aus CWC Final: दोनच दिवसात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनलचा सामना रंगणार आहे. रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

भारताने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकही सामना न गमावता फायनलपर्यंत मजल मारलीय. क्रिकेट वर्ल्डकपच्या माहोलमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांनी वर्ल्डकप कोण जिंकणार? याबद्दल भविष्यवाणी केलीय.

भारत की ऑस्ट्रेलिया कोण जिंकणार वर्ल्डकप? रजनीकांत म्हणतात..

एका मुलाखतीत रजनीकांत यांनी आगामी क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलबद्दल खुलासा केलाय. PTI च्या वृत्तानुसार, रजनीकांत म्हणाले की, "पहिल्यांदा मी सेमी फायनलदरम्यान घाबरलो होते, पण नंतर जेव्हा न्युझीलंडच्या विकेट पडत राहिल्या तेव्हा सर्व काही ठीक झाले. त्या दीड तासात मी खूप घाबरलो होतो, पण मला १००% खात्री आहे की वर्ल्डकप आपलाच आहे."

उपांत्य फेरीचा सामना पाहिल्यानंतर आता रजनीकांत 19 नोव्हेंबरला रंगणाऱ्या फायनलची आतुरतेने वाट पाहत आहे. वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना रविवारी दुपारी 2 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

हा सामना पाहण्यासाठी रजनीकांत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जाण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल रंगणार

भारताने न्युझीलंडला सेमीफायनलमध्ये हरवुन वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारली. तर काल साऊथ आफ्रिकाला हरवत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये आलीय.

त्यामुळे रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्डकपचा फायनल मुकाबला रंगणार आहे. १९८३, २०११ नंतर भारत यंदा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT