'India Lockdown' trends on Twitter, leads to some panic among users release date cast  sakal
मनोरंजन

India Lockdown: 'इंडिया लॉकडाउन'ची का होतेय एवढी चर्चा! ते भयाण वास्तव पुन्हा समोर..

मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

नीलेश अडसूळ

india lockdown: बॉलीवुड दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचे चित्रपट म्हणजे आपल्या जीवनातील वास्तव परखडपणे समोर मांडणारे असतात. मग तो "चांदणी बार'' असो किंवा ''पेज ३'' या सर्व चित्रपटातील कथा आपल्या जीवनावर आधारित असतात. आता मधुर भंडारकर पुन्हा घेऊन येत आहेत आपण सगळ्यांनीच अनुभवलेल्या या भयाण वास्तवाची कहाणी म्हणजेच.. 'इंडिया लॉकडाउन' हा चित्रपट. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे.

('India Lockdown' trends on Twitter, leads to some panic among users release date cast )

‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. २०२० मार्च मध्ये संपूर्ण जगावर कोरोनाचे महासंकट आले होते. आणि त्या दरम्यान भारताची परिस्थिती बिकट झाली होती. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पहिल्या लाटेदरम्यान भारत सरकारने अचानक २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन घोषित केले. त्यानंतर लोकांची अक्षरशः अन्नानदशा झाली. मजूर शहर सोडून पळाले. त्यावेळी झालेल्या भीषण घटनांचे दर्शन घडवणारा हा चित्रपट आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे.

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

सध्या ट्विटर आणि सोशल मिडियावर 'इंडिया लॉकडाउन' ही सर्वाधिक ट्रेंडला आहे. गतकाळातील घटनांची धास्ती अजूनही मनाभोवती असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल आहे. एवढेच नव्हे तर विनोदी मिम्स देखील बनवले जात आहे. (madhur bhandarkar)

लॉकडाउनमध्ये आयुष्य पणाला लागलेल्या ४ पात्रांची ही गोष्ट आहे. जे आपल्या संपूर्ण समाजाचं वास्तव मांडतात. शहरांमध्ये काम करणाऱ्या मजूरांची गावी जाताना काय अवस्था झाली ही देखील या चित्रपटात दाखवली आहे. चित्रपटात श्वेता बसू प्रसाद, प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर (sai tamhankar) , आहाना कुमार आणि प्रकाश बेलावाडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वर्षातील मधुर भांडारकरचा हा दुसरा ओटीटी चित्रपट आहे. 'इंडिया लॉकडाउन' 2 डिसेंबर रोजी ZEE5 वर रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT