India Vs Australia CWC 2023 Final: आज वर्ल्डकप फायनल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियमध्ये आज दुपारी २ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा फायनलचा सामना रंगणार आहे. भारतातील नव्हे तर जगातील जनतेचं लक्ष या फायनलकडे आहे.
वर्ल्डकप फायनलमध्ये सुप्रसिद्ध कलाकार त्यांच्या अदाकारीने सामन्याची शान वाढवणार आहेत. पाहा फायनलमध्ये कोणाचे परफॉर्मन्स पाहायला मिळणार.
या कलाकारांचे परफॉर्मन्स पाहायला मिळणार
जोनिता गांधी - ही एक इंडो-कॅनेडियन गायिका आहे. इनिंग ब्रेक दरम्यान तिचा दमदार परफॉर्मन्स होईल.
प्रीतम चक्रवर्ती- बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आहेत. दोन इनिंगमध्ये असलेल्या विश्रांतीदरम्यान त्यांचं लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे.
आकासा सिंह- 'खिच मेरी फोटो' फेम गायिका आकासा सिंग रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाइव्ह परफॉर्म करणार आहे. ती 'बिग बॉस 15' मध्येही सहभागी झाली होती.
अमित मिश्रा - अनेक लोकप्रिय गाण्यांचा आवाज आणि प्रसिद्ध असलेले गायक अमित मिश्रा वर्ल्डकपमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे.
नकाश अझीझ - संगीतकार ए आर रहमानचे सहाय्यक म्हणून यांची ओळख आहे. 38 वर्षीय गायक नकाश अझीझ वर्ल्ड कप फायनलमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहेत
तुषार जोशी - 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील गाण्यांसाठी तुषार जोशींची ओळख आहे. तुषारच्या गाण्यांची जादू वर्ल्डकप फायनलमध्ये पाहायला मिळणार आहे.
तब्बल ४५ दिवसांपासून सुरू असलेला क्रिकेट विश्वचषकाचा रणसंग्राम अखेरच्या टप्प्यात पोचला असून १० पैकी १० सामन्यांत विजय मिळविणारा भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम युद्ध जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामना पाहण्यासाठी रजनीकांत, शाहरुख, सलमानपासुन अनेक लोकप्रिय कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.