Indian Movie Oscar Nomination esakal
मनोरंजन

Indian Movie Oscar Nomination: ...म्हणून भारतीय चित्रपटांना 'ऑस्कर' मिळत नाही?

दरवर्षी भारताकडून ज्या चित्रपटांची नावं ऑस्करसाठी पाठवली जातात त्यांना अजुनपर्यत ऑस्कर मिळालेला नाही.

युगंधर ताजणे

Indian movies oscar nomination 2022 why not get oscar long years: दरवर्षी भारताकडून ज्या चित्रपटांची नावं ऑस्करसाठी पाठवली जातात त्यांना अजुनपर्यत ऑस्कर मिळालेला नाही. यंदा प्रख्यात दिग्दर्शक पॅन नलिन यांच्या छेलो शो (द लास्ट शो) ची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्याला ऑस्कर मिळण्याची शक्यता ही एस एस राजामौली यांच्या आरआरआरपेक्षा अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पॅरासाईटला जेव्हा ऑस्कर मिळाला होता तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की, पॅरासाईटमध्ये असे काय आहे की त्याला ऑस्कर देण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर, काही सिनेमाविषयक मासिकांमध्ये त्याच्यावरील विश्लेषण अभ्यासकांकडू मांडलं गेल्यानंतर त्यावर चर्चा सुरु झाली. गरीबी, गरिब व्यक्तीकडून पाहिलं जाणारं स्वप्न, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, तर कधी कधी आपण कधीही श्रीमंत होऊ शकत नाही याची पूर्णपणे जाणीव झाल्यानंतर तयार होणारी असुरक्षितता यासारख्या अनेक मुद्यांवर पॅरासाईटनं भाष्य केले होते.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जागतिक पातळीवर पॅरासाईटची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. मानवी संबंध किती गुंतागुंतीचे असू शकतात, त्याला किती वेगवेगळे कंगोरे असू शकतात हे पॅरासाईटनं दाखवून दिले होते. आता त्या चित्रपटाची कथा, त्यातील संवाद, कथेला पुरक असणारे छायाचित्रण, चित्रपटातील सौंदर्यस्थळं याचा विचार केल्यानंतर पॅरासाईट किती वेगळा होता हे दिसून येईल.

आता भारतीय चित्रपटांकडे आल्यानंतर ते चित्रपट कुठे कमी पडतात हे दिसून येईल. चित्रपटांची कथा, त्याला चालु घडामोडींचे असणारे संदर्भ, भलेही एखादा ऐतिहासिक चित्रपट असेल पण त्याला सद्यस्थितीचे संदर्भ असू शकतात ऑस्करनं काही ऐतिहासिक चित्रपटांना दिलेल्या ऑस्करवरुन दिसून येते. भारताचा लगान ज्यावेळी परकीय भाषांमधील सर्वोत्तम चित्रपट म्हणून ऑस्करमध्ये गेला होता तेव्हा त्याची स्पर्धा होती नो मॅन्स लँडशी. या चित्रपटाला ऑस्कर मिळाला आणि लगानच्या पदरी निराशा आली होती. नो मॅन लँडचा विषय, त्याचे संदर्भ,त्याचे निर्मितीमुल्य, दिग्दर्शकानं त्यातून युद्धासारख्या महत्वाच्या विषयावर जीवघेण्या विनोदाच्या निमित्तानं केलेलं भाष्य हे त्यावेळच्या परीक्षकांना भावले होते.

वरील चर्चा विचारात घेतल्यानंतर बॉलीवूडचे चित्रपट नेमकं कोणत्या विषयात कमी पडतात हे लक्षात येईल. तद्दन मसालापट तयार करणे, निर्मितीमुल्य, चित्रपटाची कथा, दिग्दर्शकाची पडद्यावर ती कथा सादर करण्याची शैली, छायाचित्रण, संकलन, साउंड, म्युझिक या साऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आपल्याकडचे प्रेक्षक सुजाण आहेत. त्यामुळे त्यांनाही खरचं एखादा चित्रपट जेव्हा ऑस्करसाठी अधिकृत पाठवला जातो तेव्हा तो कसा आहे हे त्यांना माहिती असते.

जसे की आतापर्यत अमिताभ, अभिषेकचा द्रोण, गली बॉय पासून ते आताच्या छेलो शो पर्यत चित्रपटांची नावं सांगता येतील. राजामौली यांच्या आरआरआऱला देखील ऑस्करच्या नॉमिनेशन यादीमध्ये शॉर्ट लिस्ट झाला आहे. त्यानंतर होम्बाळे प्रॉडक्शन हाऊसच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या कांतारानं देखील ऑस्कर शॉर्टलिस्टसाठी प्रमोशन सुरु केले आहे. दुसरीकडे आतापर्यत टॉलीवूडच्या चित्रपटांची ऑस्करच्या शॉर्ट लिस्टिंगसाठी झालेली निवडही चिंतेचा विषय आहे. फार कमी चित्रपटांच्या वाट्याला ती संधी आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT