India's Best Dancer 3 Winner Samarpan Lama  Esakal
मनोरंजन

India's Best Dancer 3 Winner: पुण्याचा समर्पण बनला 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3'चा महाविजेता! चमकत्या ट्रॉफीसह मिळालं लाखोंचं बक्षीस!

Vaishali Patil

india's best dancer season 3 winner: डान्स रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर सिझन 3 चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या एकूण पाच स्पर्धकपैकी एकाची इंडियाज बेस्ट डान्सर म्हणून निवड करण्यात आली. यात पुण्याच्या समर्पण लामाने 'इंडियाज बेस्ट डान्सर'चा किताब आपल्या नावे केला.

पुण्याचा रहिवासी असलेल्या समर्पण लामाने यावर्षीच्या सिझनची ट्रॉफी जिंकली आहे. त्याच्या अतुलनीय नृत्याने आणि क्यूटनेसने त्याने केवळ जजचं नव्हे तर देशभरातील लोकांचीही मनं जिंकली.

समर्पणने उत्कृष्ट कामगिरीने करत टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आणि त्यानंतर ती ट्रॉफीही आपल्या नावे केली. या चमकदार ट्रॉफीसोबतच त्याने 15 लाखांचे रोख बक्षीसही मिळवले आहे. तर त्याची कोरिओग्राफर भावना खंडुजाला 5 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

अनिकेत चौहान, अंजली ममगाई, विपुल खांडपाल आणि शिवांशू सोनी आणि समर्पण लामा यांचा टॉप 5 मध्ये यांचा समावेश होता.

पुण्याच्या समर्पण लामाने विजेतेपद जिंकलं तर अंजली ममगाई फर्स्ट रनर अप, शिवांशू सोनी सेकंड रनर अप, अनिकेत चौहान चौथा तर विपुल खंडपाल पाचवा विजेता ठरला.

आपल्या विजयानंतर समर्पण म्हणाला की, माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे. अनिकेत चौहाननंतर जेव्हा माझी टॉप 13 स्पर्धकांमध्ये निवड झाली, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी एक खरा विजय होता.

या शोमध्ये मी इतक्या पुढे जाईल याची कल्पना मी कधीच केली नव्हती. या स्पर्धेदरम्यान मला पराभव आणि विजय दोन्ही मिळाले. तुमचा पराभव होणे तितकच महत्वाचं असतं कारण ते तुम्हाला खूप काही शिकवत. असं म्हणत समर्पणने सर्वांचे आभार मानले.

शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी या शोचा ग्रँड फिनालेच्या पार पडला. गीता कपूर आणि सोनाली बेंद्रे हे शोचे जज होते तर टेरेन्स लुईस हा अनुपस्थित होता. तर नंतर गोविंद, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन देखील या शोमध्ये दिसले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT