मुंबई - कंगणाच्या मागील पत्रकारांचा ससेमिरा काही चुकत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून बातम्यांमध्ये असलेली कंगणाला विमानात बसल्यावरही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. मात्र यासगळ्यात वैतागलेल्या इंडिगो कंपनीकडून संबंधित पत्रकारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
इंडिगो केवळ त्या 9 पत्रकारांवर कारवाई करुन थांबलेली नाही तर त्यांना यापुढील काळात 15 दिवसांसाठी विमानप्रवासाला बंदी घातली आहे. या पत्रकारांनी विमान प्रवासाचे सगळे नियम धाब्यावर बसवून मनमानीपणा केल्याचे हवाई प्रशासनाने म्हटले आहे. संबंधित कंपनीने हा सर्व प्रकार विमानन नियामक नागर महानिर्देशालय यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर प्रशासनाने इंडिगोला त्या पत्रकारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
पुढे इंडिगोने 9 पत्रकारांवर 15 दिवसांसाठी सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी प्रवासास बंदीची कारवाई केली आहे. ज्या विमानातुन अभिनेत्री कंगणा प्रवास करीत होती त्यातुन हे 9 पत्रकार प्रवास करीत होते. कंगणा ही चंदीगढ वरुन मुंबईला निघाली होती. यावेळी कंगणाचे फोटो, तिची प्रतिक्रिया घेण्यासाठी छायाचित्रकारांची गडबड सुरु होती.
यासगळ्या वातावरणात आपल्याकडून सोशल डिस्टन्सचा भंग होतोय हे त्या पत्रकारांच्या लक्षात आले नाही. त्यांच्याकडून कंगणाशी बोलण्यासाठीची धडपड सुरु होती. त्यामुळे गोंधळ सुरु झाला.अशा कारणास्तव विमान प्रशासनाने कारवाई केली आहे. कंगणा 9 सप्टेंबर रोजी इंडिगोच्या फ्लाईट नं 6E-264 या विमानातून चंदीगढ वरुन मुंबईला निघाली होती. त्या दरम्यानच्या काळात पत्रकारांकडून झालेल्या अरेरावीला तिला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.