मुंबई : मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनमधील संबंध चिघळले आहेत. या दोन्ही देशांच्या संबंधांत मोठी कटुता आल्याचे दिसून येत आहे. मात्र या ताणलेल्या संबंधांचा परिणाम मनोरंजन क्षेत्रातही दिसत आहे. आमीर खानचा महात्वाकांक्षी आगामी चित्रपट “ लालसिंग चढ्ढा ”चे लडाख येथील चित्रीकरण रद्द करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या
चित्रपटाचे बरेचशे चित्रीकरण पर पडलेले आहे. लडाख येथे चित्रपटातील काही महत्वपूर्ण अशा भागांचे चित्रीकरण अद्याप व्हायचे बाकी असल्याचे समजते.
मध्यंतरीच्या काळात त्या विभागातील चित्रीकरणाची तयारीही सुरू झाली होती . मात्र गलवान खोऱ्यात भारत व चीनच्या सैनिकांत चकमकी घडली. त्यामुळे लडाख येथे जाण्याचे या चित्रपटाच्या टीमने अद्याप टाळले आहे. कारण तेथे चित्रीकरणाला आता परवानगी मिळणे मुश्कील झाले आहे.
भारत - चीन संबंध लवकर सुरळीत होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी लडाखऐवजी प्रोडक्शन टीमकडून कारगिलच्या पर्यायाचा विचारही केला जात असल्याचे समजते. याबाबत आमीर खान आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्यात बोलणी सुरू आहेत.
हे ही वाचा : पॅसेजमध्येच रुग्णांना ऑक्सिजन; डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार...
आमीर खानच्या प्रोडक्शन कंपनीच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळते की , आता लडाखऐवजी कारगिलचा पर्याय चांगला आहे. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करूनच चित्रीकरण करायचे असे ठरलेले आहे. मात्र आता परवानगी कुठे मिळते आणि ती कधी मिळते त्यावर सगळे अवलंबून आहे. सध्या तरी चित्रीकरण तात्पुरते बंद आहे. आमीर सोबतच करीना कपूर व मोना सिंह यांच्या भूमिका असलेल्या लाल सिंग चढ्ढा ची प्रेक्षकांना घोषणेच्या दिवसापासूनच मोठी उत्कंठा लागली आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
Indo China tensions Filming of Aamir Khans movie canceled
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.