अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी तिने व्यावसायिक वैभव रेखीशी लग्नगाठ बांधली. दिया मिर्झाचं हे दुसरं लग्न असून साहिल संघाला तिने २०१९ मध्ये घटस्फोट दिला होता. पाच वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
लहानपणी सहन केलं आई-वडिलांच्या घटस्फोटाचं दु:ख
दिया चार वर्षांची असताना तिचे आई-वडील विभक्त झाले. या धक्क्यातून सावरणं तिच्यासाठी कठीण होतं. मात्र आईचा खंबीर पाठिंबा मिळाल्याने ती या दु:खातून सावरली. साहिल संघा आणि दिया गेल्या अकरा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. २०१४ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या पाच वर्षांनंतर या दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. साहिलचं लेखिका कनिका ढिल्लनशी अफेअर असल्याचं म्हटलं जातं. यामुळेच दियाने त्याला घटस्फोट दिल्याचं समजतं.
हेही वाचा : कालीन भैय्या चक्क हँडपॅन वाजवतोय, पाहा व्हिडीओ
वैभव रेखीसोबत वाढली जवळीक
दिया मिर्झा आणि वैभव रेखी हे लॉकडाउनदरम्यान लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. वैभवचंही हे दुसरं लग्न असून त्याने याआधी योग प्रशिक्षक सुनैनाशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.
मुंबईतील वांद्रे याठिकाणी दिया आणि वैभवचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी दियाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. लग्नसोहळ्यानंतर तिने स्वत: फोटोग्राफर्स व पत्रकारांना मिठाई वाटली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.