Womens day 2022: आपण आज बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींना ग्रेट (Bollywood movie) समजत असलो तरी त्यांना ज्या भूमिका करणं जमत नाही, किंवा जे स्टंट करण शक्य होत नाही त्या करणाऱ्या स्टंटवुमनकडे (entertainment news) जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं (world womens day 2022) आपण अशाच एका महिलेचा प्रवास जाणून घेणार आहोत. ज्या महिलेनं बॉलीवूडमध्ये पहिली महिला स्टंटवुमन (bollywood actress) म्हणून मान मिळवला. ती महिला कोण आहे हे आपण पाहणार आहोत. रेश्मा पठाण यांच्याविषयी फार कमी जणांना माहिती आहे. आताच्या पिढीला तर त्यांचे नाव देखील माहिती नसेल.
हेमा मालिनी (hema malini) आणि रेश्मा पठाण यांच्यात वेगळे नाते होते. 15 ऑगस्ट 1975 ला शोले प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये बसंतीचा टांगा हा एका दगडाला धडकतो आणि तुटतो असा प्रसंग होता. यावेळी रेश्मा यांनी हेमा मालिनी यांच्या डुप्लिकेटची भूमिका केली होती. जेव्हा टांगा ज्या दगड़ाला धडकतो तेव्हा तो तुटण्याऐवजी रेश्मा यांच्या अंगावर पडला होता. त्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्यांना असे वाटले होते की रेश्मा यांचा जीव गेला मात्र त्याप्रसंगातून दैव बलवत्तर म्हणून त्या बचावल्या होत्या. हिंदी चित्रपट कर्जमध्ये देखील त्यांना जीवघेणा अपघात झाला होता. एका ट्रकनं त्यांना धडक दिली होती.
रेश्मा यांनी केवळ हेमा मालिनीच नाही तर श्रीदेवी, रेखा, मीना कुमारी, बिंदीया गोस्वामी सारख्या मोठमोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले होते. रेश्मानं भोजपूरी चित्रपट क्षेत्रामध्ये देखील कौतूकास्पद कामगिरी केली होती. रेश्मा यांनी एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की, स्टंट करण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या भाषेची गरज नाही. वयाच्या 14 व्या वर्षी रेश्मा यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.