Internet furious at Netflix for re-releasing Titanic after submersible Titan tragedy SAKAL
मनोरंजन

Titanic Netflix: मेलेल्या टाळूवरचं लोणी.. टायटन घटनेनंतर नेटफ्लिक्सने घेतलेल्या निर्णयाने नाराजी

अलीकडेच टायटन शोकांतिकेने संपूर्ण जग हादरून गेलं. पण अशातच नेटफ्लिक्सने घेतलेल्या निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत

Devendra Jadhav

Titanic Netflix Re Release News: अलीकडेच टायटन शोकांतिकेने संपूर्ण जग हादरून गेलं. पण अशातच नेटफ्लिक्सने घेतलेल्या निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.

यामागचं कारण म्हणजे येत्या काही दिवसात जेम्स कॅमेरॉनचा आयकॉनिक चित्रपट टायटॅनिक पुन्हा प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्यक्ती या नेटफ्लिक्सच्या या निर्णयाबद्दल संताप दाखवत आहेत.

(Internet furious at Netflix for re-releasing Titanic after submersible Titan tragedy )

हॉलिवूड रिपोर्टरनुसार, नेटफ्लिक्स 1 जुलै रोजी ऑस्कर-विजेता टायटॅनिक सिनेमा पुन्हा रिलिज करत आहे. या निर्णयामुळे अनेक जण संतप्त झाले आहेत.

एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, ट्विटर वापरकर्त्याने म्हटले, "म्हणून नेटफ्लिक्सचं असं म्हणणं आहे कि, 'चला या गोष्टीचा त्वरीत फायदा करून घेऊ..." याशिवाय दुसऱ्या एका युजरने लिहिले " "खराब वेळ" असे ट्विट केले आहे. एका व्यक्तीने "भयानक" अशी टिप्पणी केली.

अहवालानुसार, टायटन बेपत्ता होण्यापूर्वी नेटफ्लिक्सच्या जुलैमधील चित्रपटांच्या यादीत टायटॅनिकचे नाव होते. परंतु हि घटना घडल्यावर नेटफ्लिक्सने त्यांच्या वेळापत्रकात बदल केला आणि आता टायटॅनिक सिनेमा १ जुलैला पुन्हा रिलीज होतोय.

एकूणच दुर्दैवी घटनेचा वापर नेटफ्लिक्सने स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतलाय, असं फॅन्सचं म्हणणं आहे. आतापर्यंत, टायटॅनिक प्राइम व्हिडिओवर पाहता येतोय.

काय आहे टायटन दुर्घटना?

गेल्या काही दिवसांपासून टायटन ही पाणबुडी चर्चेत आहे. टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी या पाणबुडीतून पाच अब्जाधीश समुद्राखाली गेले होते.

मात्र, त्याच्या या प्रवासाचा शेवट अत्यंत दुःखद झाला. ही पाणबुडी गायब झाल्यानंतर पाच दिवसांनी या सर्वांना मृत घोषित करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT