Irfan Khan Bollywood  esakal
मनोरंजन

Irfan khan : 'खरं तेच सांगणार, अजूनही इरफान अनेकांना...' पत्नी सुतापा पुस्तक लिहिणार

सुतपा या येत्या काळात इरफानवर एका पुस्तकाची निर्मिती करणार असल्याची माहिती आहे.

युगंधर ताजणे

Irfan khan : बॉलीवूडचा प्रसिद्ध दिवंगत अभिनेता इरफान खानचं जाणं हे त्याच्या चाहत्यांसाठी खूप वेदनादायी होतं. जगभर त्याचा चाहतावर्ग होता. केवळ भारतातीलच नव्हे तर वेगवेगळ्या देशातील प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे चाहते होते. इरफाननं त्याच्या कारकीर्दीमध्ये जितक्या चित्रपटांमध्ये काम केले त्यात त्यानं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले. Irfan Khan Bollywood Actor Sutpa Sikadar write biographical

आता इरफानचा मुलगा बाबील हा देखील चित्रपटामध्ये आला आहे. त्याच्या अभिनयाला देखील चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यानं क्वॉला नावाच्या मालिकेतून ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. त्याचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे. इरफानच्या पत्नीनं सुतापा यांनी त्याच्यावर चरित्रात्मक पुस्तक लिहिण्याचा संकल्प सोडला आहे. आजवर तुम्ही इरफानबद्दल जे काही ऐकलं आहे, वाचलं आहे त्यापेक्षा वेगळं असं काही मी तुम्हाला सांगणार आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

अशा प्रकारे सुतापा यांनी त्या चरित्रात्मक पुस्तकाविषयी सांगितलं आहे. सुतपा या येत्या काळात इरफानवर एका पुस्तकाची निर्मिती करणार असल्याची माहिती आहे. २९ एप्रिल २०२० रोजी इरफान खान यांनी अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. त्यांना एक दुर्धर आजार जडला होता. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर सुतपा या नेहमीच इरफानशी संबंधित वेगवेगळ्या पोस्ट शेयर करताना दिसतात.

बाबील देखील आपल्या वडिलांविषयीच्या खास आठवणींना उजाळा देताना दिसतो. इरफान यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा शोध मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून घेणार आहे. अजूनही त्याचे बरेचसे व्यक्तिमत्व हे त्याच्या चाहत्यांना माहिती नाही. एक मनस्वी कलाकार म्हणून त्याची विचार करण्याची वृत्ती, त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन या साऱ्या गोष्टी मी यानिमित्तानं त्याच्या चाहत्यांना सांगू शकणार आहे.

मला देखील एका वेगळ्या प्रवासाचा भाग होता येणार आहे. मी जे काही सांगणार आहे ते खरे सांगणार आहे. इरफानचं आयुष्य हे ओपन बूक सारखं होतं. अनेकांनी त्याला जवळून पाहिल आहे. अशावेळी त्या कलाकाराची जे स्वभाव वैशिष्ट्य होते ते आणखी मोठ्या प्रमाणात त्याच्या चाहत्यांपर्यत पोहचावं असा माझा उद्देश आहे. असेही सुतपा यांनी यावेळी सांगितले.

मी त्यात केवळ भावनिक आवाहन वाचकांना करणार नाही. इरफानचा जो विनोदी स्वभाव होता त्यातील काही गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. A life in movies असे इरफान खानच्या चरित्रात्मक पुस्तकाचे नाव असणार आहे. असेही सुतपा यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT