isha anish engagement arundhati said about patrika kundali Aai Kuthe Kay Karte latest update sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: लग्न करताना पत्रिका पहावी की नाही? काय आहे अरुंधतीचं मत.. बघाच..

आई कुठे काय करते मालिकेला नवं वळण..

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका बरीच चर्चेत आहे. कारण अखेर अरुंधतीचं आशुतोष सोबत लग्न होऊन ती संसाराला लागली आहे. पण आई पाठोपाठच आता इशाचे ही लग्न होणार आहे. सध्या मालिकेत इशाच्या साखरपुड्याचे वारे वाहू लागले आहेत.

पण हे देखील अरुंधतीसाठी सोपे नाही. अनेक दिव्य पार करून तिला इशाचे लग्न करावे लागणार आहे. कारण हे लग्न अनिरुद्धला मान्य आहे. त्यामुळे या लग्नाला होणारा विरोध आणि अनिरुद्ध कडून केले जाणारे आरोप यामुळे अरुंधतीला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

अशातच या साखरपुड्यासाठी इशाने अनेक अटी घातल्या आहेत. तिला हा साखरपुडा अत्यंत दिमाखात करायचा आहे, पण घरच्यांना हे मान्य नाही. त्यात आता कांचनमाला म्हणजेच इशा च्या आजीने पत्रिका गुळवल्या शिवाय साखरपुडा करायचा नाही असं सांगितल्याने गोंधळ अधिकच वाढला आहे. पण अरुंधती मात्र यावर ठाम भूमिका मांडते.

(isha anish engagement arundhati said about patrika kundali Aai Kuthe Kay Karte latest update)

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कांचन आणि अप्पा आशुतोष आणि अरुंधतीच्या घरी गेलेले असतात. यावेळी साखरपुडा करताना पत्रिका पाहायला हवी असं कांचन आजी म्हणतात. त्यावर आशुतोषची आई सुलेखाताई आणि कांचन यांच्यात चर्चा होते.

'मला माहित आहे आजकाल कोणी पत्रिका बघत नाही पण माझा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे अगदीच काही अडचण आहे का ते पाहून घेऊया असं कांचन आजी म्हणतात. यावर ''हा मुद्दा मुलांच्या विरोधात जायला नको एवढंच मला वाटतं. त्या दोघांनी एकत्र आयुष्य काढायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्यात जे येईल, ते त्यांनी स्विकारावं.'' असं सुलेखाताई म्हणतात.

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या चर्चेमध्ये अरुंधती देखील सहभागी होते आणि कांचन आजींची समजूत घालत म्हणते, ''पूर्वीच्या काळी अनोळखी व्यक्तीशी लग्न होत असल्याने एकमेकांचा परिचय नसायचा त्यामुळे त्यांचं सगळं जुळेल ना हे पाहण्यासाठी पत्रिका पहायचे. पण आता तर ही मुलं एकमेकांच्या सहवासार असतात. एकमेकांना नखशिखांत ओळखतात. त्यामुळे पत्रिकेची काय गरज.. आणि समजा पत्रिका नाहीच जुळली तरी ही मुलं ऐकणार आहे थोडीच.. ते म्हणतील आम्ही आमची जबाबदारी घेऊ.. आणि ते बरोबरही आहे..''

त्यावरही कांचन आजी हट्ट धरतात की पत्रिका पाहायची म्हणून.. पण अरुंधती म्हणते, ''अहो दुःख, संकटं, कुणाला चुकली.. यायची ती येतातच.. '' आता ईशा आणि अनिशची पत्रिका जुळणार का? नाही जुळली तर पुढे काय होणार असं रंजक वळण मालिकेत येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT