Vineet Raina Wedding:  Esakal
मनोरंजन

Vineet Raina Wedding: प्रसिद्ध अभिनेता विनीत दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! श्वेता तिवारीनं शेअर केला फोटो!

विनीत रैनाने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

Vaishali Patil

Vineet Raina Wedding: इश्क में मरजावां  फेम अभिनेता विनीत रैना हा त्याच्या मालिकांमुळे नेहमी चर्चेत असतो. मात्र आता विनीतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विनीत रैनाने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. विनीतने गुपचूप लग्न केले आहे.

27 नोव्हेंबरला त्याने अपेक्षासोबत लग्न केले. एका खाजगी समारंभात विनीतचे लग्नगाठ बांधली. अभिनेत्री श्वेता तिवारीने या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विनीतने जवळच्या लोकांच्या उपस्थितीत अपेक्षाशी लग्न केले. अपेक्षा ही व्यवसायाने नर्स आहे. 27 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशच्या खोऱ्यात हा विवाह सोहळा पार पडला. Trending marathi news

विनीतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या फोटोंमध्ये विनीत गोल्डन कलरच्या शेरवानीमध्ये तर अपेक्षा लाल रंगाच्या ब्राइडल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

सध्या सोशल मिडियावर विनीत आणि त्याची पत्नी अपेक्षाच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकरी दोघांचे अभिनंदन केले आहे.

विनीत रैनाने मरजावां, माय लॉस्ट होम, हर घर कुछ कहता है, कसक, परदेस में है मेरा दिल, तू आशिकी, बेगुसराय, ये है मोहब्बते, पुनर्विवाह यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

विनीतचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी 2009 मध्ये त्यांनी अभिनेत्री तनुश्री कौशलसोबत लग्न केले होते. पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही. अवघ्या दोन वर्षांनीच त्यांचा घटस्फोट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT