Jacqueline Fernandez Car:  Esakal
मनोरंजन

Jacqueline Fernandez Car: आलियानंतर आता जॅकलिनच्या कारची होतेय चर्चा! लक्झरी इलेक्ट्रिक काराची किंमत ऐकून बसेल शॉक

Vaishali Patil

Jacqueline Fernandez Car:  बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या चित्रपटापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्तच चर्चेत असते. ती कधी तिच्या स्टाईलमुळे आणि सोशल मिडिया पोस्टमुळे चर्चेत असते. मात्र आता ती तिच्या लूक किंवा अभिनयामुळे नव्हे तर तिच्या नव्या कोऱ्या कारमुळे चर्चेत आली आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, जॅकलिन फर्नांडिस आता एका आलिशान कारची मालकिण झाली आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती या कारमधून प्रवास करताना दिसत आहे.

जॅकलीन फर्नांडीस तिच्या नवीन लक्झरी कार BMW i7 मध्ये फिरताना दिसली आहे. BMW i7 ही इलेक्ट्रिक कार आहे. तर मिडिया रिपोर्टनुसार या कारची किंमत 2 कोटींच्या पुढे असल्याचा दावा करण्यात येत आहे.

जॅकलिनला लक्झरी आणि महागड्या कारचा खुप शौक आहे. तिच्याकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. BMW i7 व्यतिरिक्त, जॅकलिनकडे Hummer H2, Mercedes Benz Macebuck 500, Range Rover Vogue, BMW 525d आणि Jeep Compass या कार आहेत.

जॅकलिन ही तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त कॉनमन सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. तिचे नाव सुकेशसोबत जोडले गेले. तिचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.

आता सुकेश जेलमध्ये आहे. तरी देखील तो तुरुंगातून जॅकलिनला प्रेमपत्र लिहितो. ज्यांची सोशल मिडियावर खुपच चर्चा होते. जॅकलिनची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती.

आता मात्र जॅकलिनने तिच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. मर्डर 2, किक, जुडवा 2, रेस 3, यासारख्या हिट सिनेमात जॅकलिन दिसली आहे. ती शेवटची सर्कस आणि रामसेतू या चित्रपटांमध्ये दिसली होती. आता ती फतेह आणि वेलकम टु द जंगल या चित्रपटात दिसणार आहे. वेलकम टु द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT