Jagjit Singh parwez musharraf esakal
मनोरंजन

Jagjit Singh Birth Anniversary : 'जगजित सिंग गात होते, परवेझ मुशर्रफ तबला वाजवत होते!'

मनोरंजन विश्वात आपल्या सुरावटींनी चाहत्यांना अवीट सुरांचा आनंद देणाऱ्या जगजित सिंग यांची जगभरामध्ये ख्याती होती. खासकरुन पाकिस्तानमध्ये देखील त्यांचा मोठा चाहतावर्ग होता.

सकाळ डिजिटल टीम

Jagjit Singh News Viral : मनोरंजन विश्वात आपल्या सुरावटींनी चाहत्यांना अवीट सुरांचा आनंद देणाऱ्या जगजित सिंग यांची जगभरामध्ये ख्याती होती. खासकरुन पाकिस्तानमध्ये देखील त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. आज जगजित सिंग यांची जयंती. त्यानिमित्तान आपण त्यांच्याविषयीच्या काही घटना, रंजक किस्सेही जाणून घेणार आहोत. पाकिस्तानमध्ये एका कॉन्सर्टच्या निमित्तानं केलेल्या जगजित सिंग यांचा तो प्रसंग नेहमीच सांगितला जातो.

गझल सम्राट अशी ज्यांची ओळख करुन दिली जाते त्या जगजित सिंग यांना १९७९ मध्ये पाकिस्तानमधून गायनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण आले होते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर पाकिस्तानातल्या गुप्तहेर संघटनेचा वॉच ठेवण्यात आला होता. असेही म्हटले जाते. ज्यांनी सिंग यांच्यावर वॉच ठेवला होता नंतर तेच त्यांचे मोठे फॅन झाले होते. असेही दिसून आले होते. हा किस्सा जगजित सिंग यांच्या पुस्तकामध्ये आहे.

Also Read - प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

बात निकली है तो फिर...नावाच्या पुस्तकामध्ये जगजित सिंग यांनी याविषयी खुलासा केला आहे. जगजित सिंग यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलु या चित्रपटातून त्यांच्या चाहत्यांसमोर आले आहेत. सत्या सरन यांनी लिहिलेले हे पुस्तक लोकप्रिय झाले आहे. ते हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केले आहे.

आम्ही जेव्हा पाकिस्तामध्ये गेलो होतो तेव्हा तिथली परिस्थिती काही ठीक नव्हती. वातावरण गरम होते. तणावाच्या त्या वातावरणात आपण गायला आलो मात्र ते लोकांना आवडेल ना असा प्रश्न सारखा पडत होता. एक व्यक्ती कायम आम्हाला फॉलो करत होता. तो आमच्यावर लक्ष ठेवून होता. त्यावेळी कळलं की, आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. हा किस्सा जगजित सिंग यांच्या पत्नीनं त्या पुस्तकामध्ये सांगितला आहे.

पुढे १९९० मध्ये जगजित सिंग यांना पुन्हा पाकिस्तानला भेट देण्याची संधी मिळाली तेव्हा ते एकटेच गेले होते. त्यावेळी ते पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना भेटले होते. मुशर्रफ यांच्या घरी झालेल्या त्या खासगी बैठकीत त्या दोघांची चांगलीच जुगलबंदी रंगली होती. जगजित सिंग एकरुप होऊन गात होते तर त्यांना तितक्याच समर्पकपणे मुशर्रफ तबल्यावर साथ देत होते. हा किस्साही त्या पुस्तकामध्ये रंगवून सांगण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT