Jai Jai Swami Samartha News: जय जय स्वामी समर्थ मालिका प्रेक्षकांच्या आवडीची. जय जय स्वामी समर्थ मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या आवडीची. जय जय स्वामी समर्थ मालिका ही TRP मध्ये कायम टॉपवर असणारी मालिका आहे.
जय जय स्वामी समर्थ मालिकेतून अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भक्तिपूर्ण कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. हीच जय जय स्वामी समर्थ मालिकेची टीम अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेली आहे.
(jai jai swami samartha serial team visit akkalkot swami samartha mandir video viral)
जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकार म्हणजेच स्वामींची भूमिका साकारणारा अक्षय मुदवडकर, चंदाची भूमिका साकारणारी विजया बाबर आणि मालिकेतील इतर कलाकार अक्कलकोटला स्वामी समर्थ मंदिरात दर्शनाला गेले आहेत.
स्वामींची भूमिका साकारणारा अक्षय मुदवडकर स्वामींच्या दर्शनाला जाणं ही फार सुंदर गोष्ट घडली.
याशिवाय स्वामी समर्थांची भूमिका साकारणारा अक्षय जेव्हा अक्कलकोट मंदिर परिसरात आला तेव्हा भेटण्यासाठी त्याच्या फॅन्सनी प्रचंड गर्दी केली.
अक्षय आणि मालिकेतील सर्वच कलाकार लोकांकडून मिळणारं इतकं प्रेम बघून भावुक झाले.
अक्षयने सर्वांच्या प्रेमाचा हसत हसत स्वीकार केला. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. अक्षयने स्वामी समर्थांच्या भूमिकेत इतकं सुंदर काम केलंय की त्याला मिळणारं हे प्रेम अभूतपूर्व आहे.
सध्या पौराणिक मालिकांचे सत्र जोरदार सुरू आहे. प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी पौराणिक चारित्रावर आधारित मालिका सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठी वरील 'जय जय स्वामी समर्थ'..
सध्या कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर्थ मालिका चांगल्या वळणावर आहे. जय जय स्वामी समर्थ हि पौराणिक मालिका कलर्स मराठीची आघाडीची मालिका आहे जी चांगल्या TRP मुळे चर्चेत आहे.
या मालिकेतून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची चरित्रगाथा सांगण्यात आली आहे. ही मालिका सध्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.