Jailer Box Office Collection Day 1:  eskal
मनोरंजन

Jailer Box Office Collection Day 1: रजनीचा पिक्चर म्हणजे विषयचं हार्ड! पहिल्याच दिवशी जेलरनं केली 'इतकी' कमाई..

रजनीकांतचा चित्रपट जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.

Vaishali Patil

Jailer BO Collection Day 1: साउथ मेगास्टार रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच 10 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. जेलर चित्रपटाद्वारे रजनीकांतने तब्बल दोन वर्षांनी मोठ्यापडद्यावर धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. त्याची क्रेझ फक्त साऊथ पुरताच मर्यादित नसून देशविदेशात त्याच्या चाहत्यांची संख्या आहे.

दक्षिणेतील अनेक कार्यालयांमध्ये'जेलर' पाहण्यासाठी अधिकृत सुट्टी देण्यात आली आहे यावरुन चित्रपटाची क्रेझ किती आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

रजनीकांत चा चित्रपट रिलिज होताच चाहत्यामध्ये वेगळाच उत्साह दिसतो. त्याचे चाहते चित्रपटगृहाबाहेर त्याच्या फोटोंवर दुग्धाभिषेक करताय तर काही चाहते थिएटरच्या आतच नाचतांना दिसताय. चित्रपट पाहण्यासाठी एक जोडपं चक्क जपानवरुन आलं होतं. रजनीची जादू प्रेक्षकांवर चालली आहे.

जेलर रिलिजची वाट प्रेक्षक पाहत होते आता या चित्रपटाला रिलिज होऊन एक दिवस झाला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. जेलर या वर्षातील तिसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

मिळालेल्या आकडेवारी नुसार, जेलरने पहिल्यांच दिवशी सर्व भाषांमध्ये 44.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 52 कोटींच्या जवळपास असल्याचं बोललं जात आहे. हे अधिकृत आकडे नाहीत यात काही बदल होवु शकतो.

या वर्षांतील सर्वात जास्त कमाई करणारा जेलर हा तिसरा चित्रपट आहे. या यादित पहिलं स्थान हे शाहरुखच्या पठाणचं आहे तर दुसरं आदिपुरुषचं. पठाणच्या ओपनिंग कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खानच्या चित्रपटाचं भारतात 57 कोटींचं कलेक्शन केलं होतं.

रजनीचा जेलर चित्रपट यात 5 कोटींनी मागे राहिला आहे. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

तर आता हिदीं भाषेत आज सनी देओलचा गदर 2 आणि दुसरीकडे अक्षय कुमारचा ओएमजी 2 हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाच्या रिलिजचा जेलर वर काही परिणाम होतो की जेलरचाच सनी आणि अक्षयच्या चित्रपटावर परिणाम होईल याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT