jAILER rajinikanth GRAND SUCCESS PARTY Thalaivar  SAKAL
मनोरंजन

Jailer: जेलरची ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री होताच रजनीकांतने केली पार्टी, केक कापून केली आगामी सिनेमाची घोषणा

जेलर यशस्वी झाल्यावर रजनीकांतने केक कापून सक्सेस पार्टी साजरी केलीय

Devendra Jadhav

सध्या भारतीय सिनेमा विश्वावर 90's च्या अभिनेत्यांचा बोलबाला आहे. सनी देओलच्या गदर 2 ने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली. तर दुसरीकडे रजनीकांतच्या जेलरने बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घातलाय.

आता जेलर यशस्वी झाल्यावर रजनीकांतने सक्सेस पार्टी दिलीय. रजनीकांतने केक कापून आगामी सिनेमाच्या तयारीला लागलंय.

(JAILER rajinikanth GRAND SUCCESS PARTY Thalaivar)

10 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या जेलरने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 300 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले आहेत. चाहत्यांसोबतच रजनीकांतही आपल्या चित्रपटाच्या यशाने खूश आहेत. नुकतंच त्याने हे यश साजरं केलंय.

रजनीकांत यांनी 'जेलर'च्या टीमसोबत केक कापून धूमधडाक्यात सेलिब्रेशन केले. रजनीकांतच्या जेलरने 2023 मधील तमिळ सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रजनीकांतच्या जेलरने 'पोनियिन सेल्वन 2'लाही मागे टाकले आहे.

जेलर नंतर रजनीकांतचा आगामी सिनेमा

'जेलर'च्या यशाचा आनंद साजरा करताना रजनीकांतच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याशिवाय ट्विटरवर थलैवर 170 ट्रेंड करण्यास सुरुवात केली.

थलैवर 170 हा रजनीकांतचा पुढचा चित्रपट आहे, ज्याची घोषणा नुकतीच रजनीकांतने केली आहे. टीजे ज्ञानवेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या या चित्रपटाचे नाव फायनल नाही, त्यामुळे सध्या 'थलैवा 170' असे म्हटले जात आहे.

या घटनेमुळे रजनीकांतवर चाहते नाराज

त्याचे झाले असे की, रजनी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र रजनी यांनी त्या भेटी दरम्यान योगी यांच्या पाया पडतानाचे फोटोही सोशल मीडियावर आले. त्यावेळी नेटकऱ्यांचा भडका उडाल्याचे दिसून आले आहे.

ज्या अभिनेत्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देवाचा दर्जा दिला जातो त्या अभिनेत्यानं योगींच्या पाया पडणे हे काही नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना आवडलेले नाही. त्यामुळे रजनी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. तुमचे वय काय, योगींचे वय काय, तुम्ही जे काही केले योग्य नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT