Rajinikanth Trolls for touch feet Of CM Yogi  esakal
मनोरंजन

Jailer Rajinikanth Trolled : 'सगळ्या तामिळनाडूसाठी ही शरमेची गोष्ट! योगींच्या पाया पडले, नेटकरी चिडले!'

रजनी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

युगंधर ताजणे

Rajinikanth Trolls for touch feet Of CM Yogi : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर नावाचा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतो आहे. त्याची सगळीकडे जोरदार चर्चाही आहे. गेल्या काही दिवसांपासून रजनी यांच्या चित्रपटानं प्रेक्षकांना वेडावून टाकले आहे. अशातच रजनी एका फोटोमुळे नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहे.

त्याचे झाले असे की, रजनी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र रजनी यांनी त्या भेटी दरम्यान योगी यांच्या पाया पडतानाचे फोटोही सोशल मीडियावर आले. त्यावेळी नेटकऱ्यांचा भडका उडाल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ज्या अभिनेत्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देवाचा दर्जा दिला जातो त्या अभिनेत्यानं योगींच्या पाया पडणे हे काही नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना आवडलेले नाही. त्यामुळे रजनी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. तुमचे वय काय, योगींचे वय काय, तुम्ही जे काही केले योग्य नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

रजनीच्या जेलरनं आतापर्यत पाचशे कोटींची कमाई केली आहे. मात्र त्यांच्या योगींच्या पाया पडण्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना मात्र संताप आला आहे. तुम्ही संपूर्ण तामिळनाडूसाठी शरमेची गोष्ट केली आहे. अशाही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे यासगळ्या प्रकरणावर आता रजनी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एका युझर्सनं लिहिलं आहे की, वेस्ट मीटिंग, रजनीकांत यांनी स्वताची इमेज खराब करुन घेतली आहे. त्यांनी पाया पडण्याची कृती करायला नको होती. आतापर्यत त्यांच्या चित्रपटाला पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळत होता. आता मात्र लोकं निगेटिव्ह प्रतिक्रिया देतील असेही त्या युझर्सनं म्हटले आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, सगळ्या तामिळनाडूसाठी ही शरमेची गोष्ट आहे.

अध्यात्मचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमचा स्वाभिमान विसरुन जावा. तिसऱ्या युझ्रर्सनं लिहिलं आहे की, तुमचे वय ७१ आणि योगींचे वय ५१ तेव्हा कुणी कुणाच्या पाया पडणं बरं दिसलं असतं? रजनी यांच्या लोकप्रियतेविषयी काही शंका नाही. जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

मात्र सध्या रजनी यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ नेटकऱ्यांच्या रागाचे कारण ठरतो आहे. त्यांनी रजनी यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT