Janhvi Kapoor: बॉलीवूड स्टार्स आपल्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतात. पण या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान किती अडचणींना सामोरे जावे लागते आणि मानसिक आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो याविषयी जान्हवीनं एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.(Janhvi Kapoor says Mili took a toll on her mental health)
जान्हवी कपूर तिचा पहिला सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट 'मिली' बद्दल खूप उत्सुक आहे, जो येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी,जान्हवीनं सांगितले की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप खोलवर परिणाम झाला होता. या चित्रपटात जान्हवी एका अशा मुलीची भूमिका साकारत आहे जी अनेक तास स्टोरेज फ्रीजरमध्ये अडकते.
'मिली' हा मल्याळम हिट 'Helen'चा हिंदी रिमेक आहे.
मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित, 'मिली' हा चित्रपट निर्मात्याच्या 2019 मल्याळम हिट 'Helen' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे आणि तो सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात जान्हवीचा संघर्ष 'मिली' या मुलीच्या रूपात दाखवण्यात आला आहे. जान्हवीने सांगितले चित्रपटाच्या टीमने एक खास फ्रीझर बनवला होता, जिथे तिनं 20 दिवस 15 डिग्री सेल्सिअस तापमानात शूटिंग केले.
या चित्रपटाचा मानसिक आरोग्यावर परिणाम झाला
तिचा अनुभव सांगताना जान्हवी म्हणते, "मला आठवते की या चित्रपटाचा माझ्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला कारण मी शूटिंग संपवून घरी परत यायची आणि मला झोप लागायची,तेव्हा मला झोपेत स्वप्न पडायचे की मी फ्रीजरमध्येच आहे. मी आजारी पडली होती त्यामुळे. त्यानंतर दोन-तीन दिवस पेन किलर घ्याव्या लागल्या. तिथल्या वातावरणात आमच्या दिग्दर्शकाची तब्येतही बिघडली होती''.
जान्हवी म्हणते, "जर तुम्ही तुमच्या दिवसाचे १५ तास फ्रीजरमध्ये बंद राहून रडण्यात घालवत असाल, आणि अधूनमधून उंदीर तुमच्या अंगावर उड्या मारत असेल तर अर्थात ते नक्कीच ग्लॅमरस आयुष्य नाही''. या चित्रपटासाठी आपण ७.५ किलो वजन वाढवल्याचं देखील जान्हवी म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.