Jawan Actress Aaliyah Qureishi Recalls Thailand Mall Shooting Experience  SAKAL
मनोरंजन

Aaliyah Qureishi: थायलंडच्या मॉलमध्ये गोळीबार, जवान मधील अभिनेत्री थोडक्यात वाचली

जवान मध्ये काम करणारी आलिया कुरेशी थायलंडमध्ये गोळीबारात थोडक्यात वाचली

Devendra Jadhav

अलीकडेच शाहरुख खान स्टारर 'जवान' सिनेमा प्रचंज गाजला. याच सिनेमातील एक अभिनेत्री थायलंडमध्ये झालेल्या गोळीबारात थोडक्यात वाचली. ही अभिनेत्री म्हणजे आलिया कुरेशी.

आलिया कुरेशीने सोशल मीडियावर तिला आलेला भयावह अनुभव शेअर केलाय. आलियासमोरच झालेल्या गोळीबारात दोन व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झालाय.

(Jawan Actress Aaliyah Qureishi Recalls Thailand Mall Shooting Experience)

अभिनेत्री आलिया कुरेशी हिने अलीकडेच थायलंडमध्ये एका 14 वर्षीय बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहिल्याचा एक त्रासदायक प्रसंग आठवला.

तिने तिच्या सोशल मीडियावर ATM मध्ये उशीर पैसे काढायला उशीर झाल्यामुळे ती आणि तिचे मित्र या गोळीबारात कसे वाचले याचा खुलासा तिने केलाय.

ही घटना घडल्यानंतर अभिनेत्रीने एक लांबलचक नोट लिहिली आहे. आलिया लिहिते, "तुमच्यापैकी काही जणांनी विचारल्याप्रमाणे, मी सियाम पॅरागॉनच्या शूटिंगच्या वेळी थायलंडमध्ये होतो. खरं तर, मी आणि माझे 2 मित्र मॉलमध्ये होतो तेव्हा हे घडले. आम्ही एस्केलेटरवर येत होतो तेव्हा आम्हाला अचानक गोंधळ ऐकू आला. कोणीतरी 'शूटर' म्हणून ओरडले. आम्ही परत खाली पळत सुटलो. 3 बंदुकीच्या गोळ्या ऐकल्या. तो एक भयानक अनुभव होता."

वास्तविक जीवन अॅक्शन चित्रपटांसारखे असावे, जिथे तुम्ही निर्भयपणे कोणत्याही क्रूर लढाईत उडी मारून सर्वांना वाचवू शकता. पण जेव्हा ते घडते तेव्हा तुमच्या मनात एकच विचार असतो की तुमचा जीव वाचावावा. जीवन हे अनपेक्षित आहे."

आलियाने शेवटी नमूद केले, "मी एक विचार केला की एस्केलेटरवर जाण्यापूर्वी आम्ही ATM मध्ये 10 मिनिटे घालवली. आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. जर आमचं काम लवकर झालं असतं तर कदाचित आम्हीही शुटींगमध्ये सापडलो असतो. जे होतं ते चांगल्यासाठी असंच म्हणायचं"

जवान सिनेमात आलियाने शाहरुखसोबत काम केलं. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर १००० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT