Jawan Controversy Shah Rukh Khan movie : किंग खानच्या जवानवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत असताना काही जणांनी त्याच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. याच वर्षांपूर्वी शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद झाला होता. आणि वेगळ्याच प्रकारचे वातावरण तयार झाले होते.
आता जवानवर देखील अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. किंग खानचा हा चित्रपट बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे अवघ्या पाच दिवसांत तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या जवानवर होत असणाऱ्या टीकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही जणांना मोठा धक्काही बसला आहे.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीनं दिग्दर्शित केलेल्या जवाननं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. त्यात विजय सेतुपति, नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणि आणि दीपिका पदुकोण या कलाकारांची भूमिका आहे. असे असताना केवळ बॉलीवूडच नाहीतर परदेशातही या चित्रपटानं मोठी कमाई केल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात हा चित्रपट शाहरुखच्याच पठाणचे देखील रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे बोलले जात आहे.
आता अशी चर्चा आहे की, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ८० च्या दशकांतील आखरी रास्ता नावाचा जो चित्रपट होता त्यावर शाहरुखचा जवान आधारित असल्याचे बोलले जात आहे. इ टाईम्सनं याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी प्रसिद्ध सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांच्याशी देखील बातचीत केली होती. प्रेक्षकांना या दोन्ही चित्रपटांमध्ये अनेक गोष्टीत साम्य असल्याचे दिसून आले आहे.
दोन्ही चित्रपटांच्या कथांमधून मुलगा आपल्या वडीलांबाबत जे काही घडले त्याचा शोध आणि बदला घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या दोन्ही कथा एकाच पातळीवर घडत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच योगायोगानं दोन्ही कथांमधील नायक हा पोलीसच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा समज आणि दृढ झाला आहे.
ई टाईम्सशी बातचीत करताना दिलीप ठाकूर यांनी सांगितले की, आखरी रास्ताची स्टोरी ही वडील आणि मुलगा यांच्याभोवती फिरताना दिसून येते. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा डबल रोल आहे. मात्र तुम्ही ज्यावेळी जवान आणि आखरी रास्ता या दोन्ही चित्रपटांची तुलना करता त्यावेळी तुम्हाला खूप फरक दिसेल. हे दोन्ही चित्रपट पुर्ण वेगळे आहेत.
अमिताभ यांचा ८० च्या दशकांतील आखरी रास्ता हा चित्रपट दिग्दर्शक के भाग्यराज यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात जयाप्रदा, सदाशिव अमरापुरकर, कादर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.