Jawan release mahim Gaiety galaxy Cinema theater dahi handi govinda welcomes Shahrukh Khan movie  SAKAL
मनोरंजन

Jawan Release: माहिमच्या गैटी गॅलक्सी थिएटरमध्ये गोविंदांनी थर रचून केलं शाहरुखच्या जवानचं दणक्यात स्वागत

शाहरुखच्या जवानला गोविंदांनी अनोखी सलामी दिलीय

Devendra Jadhav

Jawan Release Video: शाहरुख खानचा जवान आज ७ सप्टेंबरला रिलीज झालाय. काही दिवसांपुर्वी जवानचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हापासुनच जवान पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याच वर्षी २०२३ मध्ये शाहरुखचा पठाण सिनेमा रिलीज झाला होता.

पण पठाण पेक्षाही जास्त क्रेझ जवानची दिसत आहे. माहिमच्या गैटी गॅलेक्सी सिनेमागृहात खऱ्या अर्थाने प्रेक्षक प्रत्येक सिनेमाचं दणक्यात सेलिब्रेशन करतात. आता शाहरुखचा सिनेमा म्हटल्यावर या सेलिब्रेशन आणखी उत्साह संचारलाय.

शाहरुखचा जवान आणि आज असणारी दहीहंडी हा एक विलक्षण योगायोग जुळून आलाय. एका गोविंदा पथकाने थर रचून शाहरुखच्या जवानला अनोखी सलामी दिलीय.

(Jawan release mahim Gaiety galaxy Cinema theater dahi handi govinda welcomes Shahrukh Khan movie)

माहिमच्या गैटी गॅलेक्सी मध्ये जवानचं अनोखं सेलिब्रेशन

माहिमच्या गैटी गॅलेक्सी सिनेमागृहात दर्दी मुंबईकर प्रत्येक सिनेमाचं दणक्यात स्वागत असतात. या थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. शाहरुखचा आज रिलीज झालेल्या जवाननिमित्ताने सुद्धा असंच काहीसं वातावरण दिसतंय.

आज दहीहंडी असल्याने एका गोविंदा पथकाने माहिमच्या गैटी गॅलेक्सी थिएटरबाहेर हजेरी लावली होती. थिएटरबाहेर भल्या पहाटे या गोविंदा पथकाने ५ थर लावून जवानला अनोखी सलामी दिलीय. यावेळी उपस्थित पब्लिकने हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल केलाय

शाहरुखने स्वतःच्याच सिनेमाचा रेकॉर्ड मोडला

जवान चित्रपटाच्या प्री-रिलीज तिकीट विक्रीवर इंडस्ट्रीतील तज्ञ व्यक्ती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जवानची तिकीट विक्रीची संख्या अत्यंत आश्चर्यकारक आहे. संपूर्ण भारतातील उत्सुक चित्रपटप्रेमींनी पहिल्याच दिवशी तब्बल पाच लाखांहून जास्त तिकिटे काढली आहेत.

झूम डॉट कॉमनुसार जवानच्या हिंदी आवृत्तीसाठी 529,568, तमिळ आवृत्तीसाठी 19,899 आणि तेलुगू आवृत्तीसाठी बघण्यासाठी 16,230 मध्ये विभागली गेली आहे. विशेष गोष्ट म्हणजे, जवानने IMAX फॉरमॅटमध्ये 11,558 तिकीट विक्री करून लक्षणीय लक्ष वेधले आहे. इतकी जबरदस्त तिकीट विक्री बघता जवानने पठाणचा रेकॉर्ड मोडला आहे.

जवानची तगडी स्टारकास्ट

'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT