Jawan advance booking goes berserk beats pathaan 24 hour record esakal
मनोरंजन

Jawan Advance Booking : शाहरुख आला, विषयच संपला! किंग खानच्या 'जवान'नं 24 तासांत तोडलं 'पठाण'चं रेकॉर्ड

केवळ भारतातच नाहीतर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये शाहरुखचे चाहते आहेत.

युगंधर ताजणे

Jawan advance booking goes berserk beats pathaan 24 hour record: किंग खानची गोष्टच वेगळी आहे. त्याचा चित्रपट जेव्हा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद कमाल असतो. हे अनेकदा दिसून आले आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी त्याचा जवान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

केवळ भारतातच नाहीतर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये शाहरुखचे चाहते आहेत. त्याचा येणारा प्रत्येक नवा चित्रपट पाहण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे किंग खानच्या चित्रपटांचे अॅडव्हान्स बूकींगही जोरात होते. आता चर्चा जवानची सुरु आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बूकींगला जो प्रतिसाद मिळाला आहे. त्यानं नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या जवान या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगने मोठा त्याच्याच पठाण चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत देखील जवानच्या अॅडव्हान्स बूकींगविषयी चर्चा होती. आता अधिकृतपणे जवानची अॅडव्हान्स बूकींग सुरु झाली असून अनेक थिएटर्समध्ये जवानचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत.

सनीच्या गदर २ नंतर शाहरुखच्या जवानची मोठी हवा आहे. एकीकडे सनीच्या गदर २ ची सक्सेस पार्टी जोरदार होत असताना त्यात शाहरुखच्या जवानची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. जवानचा ट्रेलर आल्यानंतर त्याच्या अॅडव्हान्स बूकींगला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्याविषयी वेगवेगळ्या पोस्टही शेयर केल्या जात आहेत. मेकर्सनं शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून जवानची अॅडव्हान्स बूकींग सुरु होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर किंग खानच्या जवानच्या अॅडव्हान्स बूकींगला जोरदार सुरुवात झाली आहे.

सॅकनिकच्या एका डेटानुसार, २४ तासात जवाननं केवळ तीन मोठ्या नॅशनल सिनेमा चेन्समधून १ लाख ६५ हजार तिकीटांची अॅडव्हान्समध्ये विक्री केली आहे. यापूर्वी शाहरुखच्या पठाणला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच १ लाख १७ हजार तिकीटांची अॅडव्हान्स बूकींग केली होती.

यावरुन शाहरुखचा आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असा जवान चित्रपट किती कोटींची कमाई करणार याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. जाणकारांनी देखील त्यावर अंदाज व्यक्त केले असून हा चित्रपट त्याच्याच गेल्या काही चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT