Jawan at Burj Khalifa SRK says he will never go bald  esakal
मनोरंजन

Jawan Shah Rukh Khan : 'हे माझं शेवटचं टक्कल, यानंतर मी पुन्हा कधीही....!' किंग खाननं सांगून टाकलं

युगंधर ताजणे

Jawan’ at Burj Khalifa: SRK says he will never go bald : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा जवान आता जोरदार चर्चेत आला आहे. काल त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया कमालीच्या भन्नाट आहेत. याच वर्षी शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता त्याचा जवान सात सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे.

पठाणवरुन झालेला वाद अनेकांना माहिती आहे. मात्र सगळ्यात जास्त वाद होऊनही या चित्रपटानं तब्बल एक हजार कोटींची कमाई केल्याचे दिसून आले होते. आता तर त्यावरुन वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. दोन दिवसांपूर्वी साऊथमध्ये जवानच्या ऑडिओ रिलिजचा सोहळा पार पडला. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यासगळ्यात शाहरुखच्या एका प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शाहरुखनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यात शाहरुखनं वेगवेगळ्या भूमिका साकारुन आपले वेगळेपण सिग्द केले आहे. जवानमध्ये एक गोष्ट खास आहे. ती म्हणजे शाहरुखचा बाल्ड लूक. शाहरुखनं त्याच्या फिल्म करिअरमध्ये पहिल्यांदाच एका चित्रपटासाठी टक्कल केल्याचे दिसून आले आहे. त्यावर शाहरुखनं जी प्रतिक्रिया दिली आहे ती मात्र भन्नाट आहे.

काल दुबईतील बुर्ज खलिफावर जवानचा ट्रेलर दाखवण्यात आला. तो यावेळी हजारो प्रेक्षकांनी पाहिला. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच शाहरुखनं आपण पुन्हा कोणत्याही चित्रपटामध्ये टक्कलच्या लुकमध्ये दिसणार नाही. बाल्ड लूक केलेला हा आपला शेवटचा चित्रपट असे शाहरुखनं म्हटले आहे. शाहरुखनं असे का म्हटले हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

जवानमध्ये शाहरुखचा तो टक्कल केलेला लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. शाहरुख म्हणतो, मी या चित्रपटामध्ये बाल्ड लूक केला आहे. पण असा लूक केलेला मी शेवटचा चित्रपट असेल. हा माझा पहिला आणि लास्ट टाईम असेल. आता मी तुमच्यासाठी टक्कल पण केला. आणखी काय हवं. असेही किंग खाननं म्हटले आहे. त्यामुळे किमान माझा तो लूक पाहण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायला जा. असेही आवाहन किंग खाननं केले आहे.

कुणाला माहिती मी पुन्हा तुम्हाला अशा लूक्समध्ये दिसेल किंवा नाही हे आता सांगू शकणार नाही. अॅटली दिग्दर्शित जवान हा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये शाहरुख खान, सान्या मल्होत्रा, दीपिका पदुकोण, सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम शेतकरी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यास सुरुवात; 2000 खात्यात आले का? लगेच चेक करा

"यांच्यात नक्की काय शिजतंय ?" अंकुश -भाग्यश्रीचे फोटो झाले व्हायरल , कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाची चर्चा

नेता असावा तर असा! कुठल्याही हॉटेलला न जाता राहुल गांधींनी गाठलं थेट टेम्पोचालकाचं कौलारू घर; कोणाची घेतली भेट?

Pune Crime: बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Updates : माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन

SCROLL FOR NEXT