Jawan Fever News: शाहरुख खानचा जवान सिनेमा उद्या ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानच्या जवानची क्रेझ भारतात नव्हे तर जगभरात आहे. जवान पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत याचा अनुभव नुकताच आलाय.
भारतातले तमाम प्रेक्षक जवान पाहण्यासाठी स्वतःची झोप बाजुला ठेवुन थिएटरबाहेर तिकीटं काढताना दिसले. याचाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
(jawan Shah Rukh Khan's excited fans line up outside movie theatre at 2 AM)
मध्यरात्री २ वाजता जवान पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
जस्ट अ फॅन नावाच्या शाहरुख खानच्या फॅन ग्रुपने अलीकडेच X वर एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये SRK फॉलोअर्स पहाटे 2 वाजता लांब रांगेत उभे असुन बुकिंग काउंटर उघडण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
थिएटर हाऊसफुल्ल होण्याआधी जवानची तिकीट काढून स्वतःची जागा बुक करावी यासाठी शाहरुखचे फॅन्स जीवाचं रान करत आहेत. फॅन पेजनुसार हा व्हिडिओ महाराष्ट्रातील मालेगावमधील सिनेमागृहातला आहे.
महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात जवानची क्रेझ
यापूर्वी, मुंबई, बिहारमधील मोतिहारी आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता यासारख्या असंख्य शहरांनी जवानची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पहाटे 5 वाजता स्क्रीनिंग आयोजित केले होते.
इतकंच नव्हे तर पश्चिम बंगालमधील रायगंज इतर शहरांच्या तुलनेत पहाटे 2.15 वाजता जवानचा शो ठेवलाय. शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या जवान चित्रपटाला मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद पाहता भारतात शाहरुखची किती लोकप्रियता आणि क्रेझ आहे हे पाहायला मिळतंय.
या ठिकाणी जवानचं तिकीट खुपच स्वस्त
मुंबईत डोंगरी भागातील प्रमियर गोल्ड सिनेमागृहात जवानची तिकीट खुप कमी किमतीत विकली जात आहे. स्टॉल सीट्ससाठी 100 रुपये आणि सर्कल सीट्सचे तिकिटे 112 उपलब्ध आहेत.
तर चैन्नईतील एजीएस चित्रपटगृहात जवानचं तिकीट फक्त 65 रुपयात आहे तर दिल्लीतील शक्ति नगर परिसरातील अम्बा चित्रपटगृहांमध्ये जवानच्या तिकीटाचे दर हे 70 ते 80 रुपयांना उपलब्ध आहे.
शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. 'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.