Jawan’s clips stolen, leaked online production house files FIR the viral clips of movie at santacruz police station SAKAL
मनोरंजन

Jawan Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या क्लिप्स व्हायरल झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या क्लिप्स वायरल झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय

Devendra Jadhav

Jawan Shah Rukh Khan: शाहरुख खानचा जवान सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या क्लिप्स वायरल झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.

रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या तक्रारीवर अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

(Jawan Shah Rukh Khan A case has been registered in connection with the viral clips of movie)

कॉपीराईटचे उल्लंघन झाल्याचा दावा

जवान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान इतर कर्मचाऱ्यांना शुटींगची कोणतीही परवानगी नसताना देखील अनधिकृतरीत्या शूटिंग करून शुटींगमधील क्लिप्स व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

पाच ट्विटर हँडल वरून करण्यात जवान चित्रपटाच्या क्लिप्स शेअर करण्यात आल्या. हँडलला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली मात्र या नोटीसला एकानेच उत्तर दिलंय. या नोटीशीत कॉपीराईटचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

जवान मध्ये अनोखी स्टारकास्ट

शाहरुख, दीपिका पदूकोण, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक, विजय सेतूपती यासारख्या कलाकारांची फौज आपल्याला जवानमध्ये दिसणार आहे. अवघ्या काही वेळातच शाहरुखच्या त्या प्रीव्ह्यूला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

त्याचा वेगळाच विक्रम शाहरुखच्या नावावर झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले आहे.

जवानची रिलीज डेट

शाहरुखचा जवान हा चित्रपट हा रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन आहे. ज्याचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले असून गौरी खाननं निर्मात्या तर गौरव वर्मा सह-निर्मात्याच्या भूमिकेत आहे.

हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT