Jayant Savarkar Marathi Actor Passed Away Esakal
मनोरंजन

Jayant Savarkar: 'तुम्ही शेवटपर्यंत काम करत होतात अन्..' जयंत अण्णांच्या निधनाने मराठी कलाकार भावुक..

Vaishali Patil

Jayant Savarkar Marathi Actor Passed Away: मराठी मनोरंजन विश्वातुन एक दुख:द बातमी समोर आली आहे. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटीच्या माध्यमातुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला धक्काच बसला आहे. शंभराहून अधिक मराठी नाटक 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी काम केलं होतं. त्याच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहे.

जयंत सावरकर हे काही दिवसांपुर्वीच 'आई कुठे काय करते' या मालिकेत दिसले होते. 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झालेली संजना उर्फ रुपाली भोसलेने देखील सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेयर करत अण्णांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मालिकेतला एक व्हिडिओ शेयर करत रुपाली लिहिते की, जेव्हा जेव्हा ते 'आई कुठे काय करते' च्या सेटवर शूट करायला यायचे तेव्हा तेव्हा ते आम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि खूप पॉझिटिव्हिटी द्यायचे.

मी जेव्हा त्यांचा भेटले तेव्हा मी त्यांना नमस्कार केला त्यांनी भरपूर आशीर्वाद तर दिलाच पण त्याचबरोबर माझ्या कामाचं खूप कौतुक सुद्धा केलं. आपली सिरीयल आणि आपलं काम ते बघतात हे ऐकून खूप खूप छान वाटलं.

जबाबदारी अजून वाढली याची जाणीव झाली. अण्णा तुम्ही खूप काही दिलं आम्हा सगळ्यांना कलाकारांना अधिक खूप काही शिकवत. तुम्ही शेवटपर्यंत काम करत होतात त्याच एनर्जीने आम्हीही त्याच एनर्जीने हा क्षण शुट केला म्हणुन पोस्ट करतेय.'

जयवंत वाडकर यांनी देखील वृत्त वाहिनीशी बोलतांना त्याच्या सोबत काम करतांना आलेल्या आठवणींना उजाळा दिला. अण्णांनी त्यांना कशाप्रकारे मदत केली आणि अभिनय क्षेत्रात त्यांनी कसं काम केलं याबद्दल त्यांनी सांगतिलं. इतका हरहुन्नरी नट मिळणं कठीण असल्याचं त्यांनी सांगतिलं.

तर अभिनेता प्रशांत दामले यांनी 1987 मध्ये संगीत संशय कल्लोळ या नाटकाची आठवण सांगतिली. ते किती फिट होते आणि नेहमी कसं साकारत्मक असायचे हे त्यांनी सांगतिलं. इतकच नाही तर जयंत सावरकर हे कलाकरांसाठी युनिव्हर्सिटी होते . चांगलं काम करा असा आशीर्वाद ते प्रत्येकालाच देत असायचे असंही ते म्हणाले.

जयंत सावरकर यांचे ठाण्यात हॉस्पिटलमध्ये निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर 25 जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT