Jhalak Dikhla Jaa 10: Nia Sharma says, she was not just born pretty but...' Instagram
मनोरंजन

Jhalak dikhla Ja 10:निया शर्माचं हैराण करणारं विधान; म्हणाली,'सुंदर दिसण्यासाठी..'

मालिकांमधील दमदार अभिनयामुळे ओळखली जाणारी निया शर्मा तिच्या स्टायलिश लूकमुळे अनेकदा चर्चेत असलेली पहायला मिळते.

प्रणाली मोरे

Jhalak Dikhla Ja 10: 'जमाई राजा','एक हजारों में मरी बहना...' सारख्या मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाणारी निया शर्मा (Nia Sharma)सध्या डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा १०' ची स्पर्धक बनून पुन्हा आपल्या अदाकारीनं लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. केवळ अभिनय नाही तर आपल्या स्टायलिश लूकमुळे देखील निया शर्मा नेहमी चर्चेत असलेली पहायला मिळते. आता तर तिनं आपल्या लूकविषयी असं काही विधान केलं आहे ज्यामुळे सगळे थोडे हैराण झाले आहेत.(Jhalak Dikhla Jaa 10: Nia Sharma says, she was not just born pretty but...')

तसं पाहिलं तर एखादी अभिनेत्री कधीच आपल्या सौंदर्याविरोधात बोलताना दिसणार नाही. आपल्या सौंदर्याला कमी लेखणं हे तर कोणतीच अभिनेत्री करणार नाही. पण आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत पहायला मिळणाऱ्या निया शर्मानं मात्र बिनधास्त सगळ्यांसमोर याचा स्विकार केला आहे. तिनं म्हटलं आहे की ,''ती जन्मतः काही सुंदर जन्माला आली नव्हती''. आता हे असं तिला कुणी दुसऱ्यांन सांगितलं नाही तर हे तिचे स्वतःचे म्हणणे आहे. नियानं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ''ती जन्मतः सुंदर नव्हतीच मुळी,तर तिनं स्वतःला ग्रुम करायला खूप मेहनत घेतली आहे''. निया म्हणाली की,''माझा इंडस्ट्रीतला प्रवास काही सोपा नव्हता. तो खूपच खडतर होता. सुंदर दिसणं किती गरजेचं असतं या सत्याशी माझा जेव्हा सामना झाला तेव्हा मी त्यासाठी स्वतःवर मेहनत घेणं सुरु केलं. मी स्वतःला ग्रुम करण्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस खर्ची घालते. मी स्वतःला ग्रुम करण्यासाठी खूप कष्ट घेतलेयत कारण मला काही जन्मतः सुंदर रुप मिळालं नव्हतं''.

निया त्या मुलाखतीत म्हणाली,''मला मेकअप मुळीच यायचा नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा मी तो करायचा प्रयत्न करायचे आणि तो बिघडायचा तेव्हा मी खूप रडायचे''. निया पुढे म्हणाली,''मी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःला ग्रुम करायचं ठरवलं. कारण जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा सुरुवातीला कसंतरी उरकायचं म्हणून माझा मेकअप करुन दिला जायचा. कारण मला मेकअप कसा असतो माहितचं नव्हतं. जेव्हा मी स्वतःला पहायचे तेव्हा मी कशी दिसतेय या विचारानं मला खूप रडू यायचं''.

''तेव्हा मी स्वतःला ग्रुम करायला सुरुवात केली. मी युट्युबच्या मदतीनं मेकअप व्हिडीओज पाहून मेकअप शिकले. त्यानंतर मी इव्हेंट्सला जाताना स्वतःचा मेकअप स्वतः करू लागले. त्यानंतर मला मेकअपसाठी हळूहळू स्टायलिस्ट आणि वेगवेगळ्या टीम्सकडून ऑफर मिळू लागल्या. आज मला मोठमोठे स्टायलिस्ट मेसेजेस पाठवतात की त्यांना माझा मेकअप करायचा आहे किंवा माझा लूक ते तयार करण्यास इच्छुक आहेत. अशा ऑफर्स जेव्हा मला मिळतात तेव्हा मला खूप आनंद होतो. ज्या लोकांनी मला माझ्या या प्रवासात साथ दिली त्यांची मी नेहमीच आभारी राहीन''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT