jhimma 2 movie review directed by hemant dhome siddharth chandekar sayali sanjeev SAKAL
मनोरंजन

Jhimma 2 Review: आनंदाचा, करमणूकीचा, मनमोकळं करणाऱ्या सुंदर आठवणींचा "झिम्मा २"

झिम्माचा पहिला भाग आवडलाय? मग दुसरा भाग अर्थात झिम्मा २ कसा आहे वाचा

Devendra Jadhav

Jhimma 2 Review: प्रवास ही अशी गोष्ट आहे जिथे माणूस जुन्याचा नवा होतो. झिम्मा च्या पहिल्या भागातील ही ओळ अजूनही मनात कुठेतरी आहे. नेहमीच्या कामाच्या व्यापातून वेळ काढत प्रवास करणं आणि कुठेतरी फिरायला जाण्याची सर्वांची इच्छा असतो.

फिरायला गेल्यावर प्रवासात भेटलेली अनोळखी माणसं कधीकधी आयुष्यभराचे सोबती होतात. त्यांच्यासोबत मनमोकळं करताना, वेळ घालवताना आपण स्वतःला नव्याने सापडतो. स्वतःसाठी पुन्हा जगायला लागतो. झिम्मा चा भाग 2 पाहून हीच जाणीव होते.

(jhimma 2 movie review)

झिम्मा च्या पहिल्या भागात आपण पाहिलं की कबीरने (सिद्धार्थ चांदेकर) स्वतःची टुरिस्ट कंपनी सुरू केलीय. यावेळी पहिल्याच ट्रीपला त्याची विविध तऱ्हेच्या, स्वभावाच्या महिलांशी गाठ पडते.

याच महिलांसोबत पुन्हा एकदा ट्रीप काढायचं कबीर ठरवतो. कारण असतं इंदूचा ७५ वा वाढदिवस. ठरलं तर! पुन्हा एकदा सर्व एकत्र जमतात. या धम्माल गँगमध्ये दोघीजणी सहभागी होतात. एक म्हणजे निर्मलाची सून तान्या (रिंकू राजगुरू) आणि दुसरी वैशालीची भाची मनाली (शिवानी सुर्वे).

मग काय! सर्वजणी एकत्र आल्यावर भांडण, मतभेद, पार्टी, धम्माल तर होणारच! एकमेकांसोबत वेळ घालवता घालवता पुन्हा एकदा या सर्वांचा स्वतःला शोधायचा प्रवास सुरू करतो. दुरावलेली नाती पुन्हा एक होतात आणि प्रेक्षकांसाठी हा झिम्मा 2 संस्मरणीय बनतो.

क्वचित सिनेमे असे आहेत जे पहिल्या भागापेक्षा उजवे ठरतात. झिम्मा 2 सुद्धा असाच म्हणता येईल. पहिल्या भागातील सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले या भागात नाहीत. पण त्यांची कमी जाणवणार नाही इतकं भन्नाट काम शिवानी आणि रिंकूने केलंय. निर्मिती आणि रिंकू या सासू - सुनेच्या भांडणाचा एक uncut प्रसंग सिनेमात आहे. तो कमाल झालाय. रिंकू आणि निर्मिती यांची केमिस्ट्री लाजवाब झालीय. दोघीही सासू - सून म्हणून एकमेकींना अगदी शोभून दिसतात. झिम्मा 2 मधले असे अनेक प्रसंग आहे जे खळखळून हसवतात. आणि काही प्रसंगांनी डोळे पाणावतात.

हेमंत ढोमे आणि इरावती कर्णिक यांनी सुंदर कथा गुंफली आहे. ज्यांनी पहिला भाग पाहिला नाही त्यांना दुसरा भाग पाहताना काही अडचण येणार नाही. इतकी मस्त कथा जुळून आली आहे. परदेशातले लोकेशन्स आणि तिथल्या निसर्गाचा योग्य वापर सिनेमात केलेला दिसतो. अभिनेत्रींची निवड, त्यांचे काम हे सारं प्रभावी झालं आहे. दिग्दर्शकाला जे प्रेक्षकांपर्यत पोहचवायचं आहे ते त्यानं तितकचं सोपं करुन सांगितलं आहे. त्यामुळे झिम्मा २ अधिक खुलला आहे. काही छोटे छोटे प्रसंग विचार करायला भाग पाडतात. सिनेमातली गाणीही मस्त.

अभिनयात कमाल केलीय ती निर्मिती सावंत यांनी. निर्मिती सावंत यांचा निर्मलाच्या भूमिकेतील भाबडेपणा, वेंधळेपणा, निरागसपणा खूप क्यूट झालाय. निर्मिती छोट्या छोट्या जागा इतक्या सुरेख घेतात की प्रेक्षकांची चांगली हसवणूक होते. मगाशीच सांगितल्याप्रमाणे निर्मिती आणि रिंकू यांचा सासू - सुनेची केमिस्ट्री बघायला धम्माल येते. सुहास जोशी, शिवानी सुर्वे, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव या सर्वच जणींनी मस्त काम केलंय. या सर्वजणी एकत्र आल्यावर त्यांच्यात रंगणारे संवाद बघणं ही खरंच पर्वणी आहे. आणि या सर्व बायकांना सांभाळणारा सिद्धार्थ चांदेकरचा कबीरच्या भूमिकेतील वावर अगदी सहज.

एकूणच हा आनंदाचा झिम्मा खेळ आपली १०० % करमणूक करतो यात शंकाच नाही. झिम्मा 2 पाहताना आपणही या सर्वांसोबत प्रवास करतो. फिरतो, रडतो, मोकळे होतो. मानसिक आणि भावनिक पातळीवर स्वतःला पुन्हा एकदा नव्याने शोधायचा प्रयत्न करतो. आणि चेहऱ्यावर एक स्माईल ठेवून सिनेमागृहातून बाहेर पडतो. अजिबात चुकवू नका झिम्मा 2.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT