Happy Birthday Jeetendra : अभिनय, नृत्य, संवाद कौशल्य आणि प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे जितेंद्र यांचे नाव गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनात आहे. बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून जितेंद्र यांचे नाव घेतले जाते. सात एप्रिल हा जितेंद्र यांचा जन्मदिवस. मोठ्या संघर्षातून व्यक्ती यशाला गवसणी घालतो. त्यावेळी त्याच्या भोवती काही शत्रुही तयार होतात. मात्र त्यापैकी आपल्या घरातीलच असतात हे जितेंद्र यांना माहिती नव्हते.
जितेंद्र यांचे लग्न शोभा यांच्याशी झाले. लग्नापूर्वी त्यांचे नाव हेमा मालिनी यांच्याशी जोडले गेले होते. जितेंद्र आणि शोभा कपूर यांचे अफेयर बऱ्याच वर्षांपासून सुरु होते. त्यात जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यातील डेटिंगच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यांनी लग्नाचा देखील निर्णय घेतला होता. अशी माहिती त्यावेळच्या मनोरंजनपर मासिकांमध्येही आली होती.
Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
दुसरीकडे धर्मेंद्र हे हेमा मालिनीवर यांच्यावर प्रेम करत होते. असे म्हटले जाते की, धर्मेंद्र यांनी जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न थांबवले होते. हेमा मालिनी यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये म्हटले होते की, जितेंद्र यांच्या लग्नाच्या त्या प्रकरणानंतर त्यांनी दूर राहणे पसंत केले होते.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी सोबत देखील जितेंद्र यांचे नाव घेतले जात होते. त्यांच्या नावाची एवढी चर्चा होऊ लागली ही अखेर त्यांना त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागली. आपण कोणत्याही प्रकारे नात्यात नाही. हे जे सगळे कुणी करत आहे त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी माझी बदनामी थांबवावी. अशा प्रकारे जितेंद्र यांनी चाहत्यांना आवाहन केले होते. वाद वाढल्यानंतर श्रीदेवी यांनी देखील यापुढे आपण जितेंद्र यांच्यासोबत कधीही काम करणार नाही असा निर्णय घेतला होता.
७५ वर्षांच्या जितेंद्र यांच्यावर त्यांची चुलत बहिणीनं शाररिक अत्याचाराचा आरोप केला होता. तो आरोप बातम्यांमधून समोर आल्यानंतर पुन्हा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. त्यामुळे बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. जितेंद्र यांच्या पायाखालची जमिन सरकली होती. ज्याच्याशी आपला काही एक संबंध नाही त्यांनी अशाच प्रकारचे आरोप करणे हे त्यांच्यासाठी धक्कादायक होते. त्या बहिणीनं तर त्यांना अटक करावी अशी मागणीही पोलिसांकडे केली होती. त्यावेळी जितेंद्र यांचे वय २८ वर्षे तर बहिणीचे वय १८ वर्षे होते.
त्याचे झाले असे की, जितेंद्र यांनी त्या बहिणीला तिकिट बूक करुन चित्रपटाचे शुटिंग पाहण्यासाठी शिमल्याला बोलावून घेतले. त्यानंतर दारुच्या नशेत त्यांच्याकडून गैरवर्तन झाले अशी चर्चा त्यावेळी होती. जितेंद्र यांच्या वकिलानं त्यात जितेंद्र यांना फसविण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग करण्यात आले होते. असे सांगितले होते. तेव्हा कोर्टानं देखील जितेंद्र यांच्या बाजूनं निकाल दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.