jitendra kumar aka jitu bhaiyya new webseries dry day with shriya pilgaonka SAKAL
मनोरंजन

Jitendra Kumar Dry Day: जितू भैयाचा नवीन सिनेमा 'ड्राय डे'ची घोषणा, या तारखेपासून भेटीला

जितेंद्र कुमारच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Jitendra Kumar Dry Day Webseries: जितेंद्र कुमार उर्फ जितू भैया हा सर्वांचा लाडका अभिनेता. जितूला OTT स्टार म्हटलं जातं. जितू भैयाने आजवर कोटा फॅक्टरी, पंचायत अशा वेबसिरीजमध्ये अभिनय करुन जितू भैयाने लोकांच्या मनावर राज्य केलंय.

अशातच जितू भैयाच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. याचं नाव 'ड्राय डे'. जाणून घ्या या सिनेमाचे तपशील.

काय असणार ड्राय डेची कथा

'ड्राय डे' या सिनेमाचे कथानक देशातील एका गावात फुलते. विनोद-नाट्यमय कथेत काही काळ गुंडगिरीत असणाऱ्या गन्नू या प्रमुख पात्राचा यंत्रणेविरुद्धचा प्रवास उलगडत जातो. ही भूमिका अभिनेता जितेंद्र कुमारने साकारले आहे. आपल्या जिवलगांचा विश्वास आणि प्रेम संपादित करण्याच्या भावनिक शोधात गन्नूला इतर आव्हाने झेलावी लागतात. शिवाय त्याची स्वत:ची असुरक्षितता आणि दारूच्या व्यसनाशी संघर्ष असतो.

ड्राय डे मध्ये झळकणार हे कलाकार

सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) दिग्दर्शित आणि मोनिषा अडवाणी (Monisha Advani), मधू भोजवानी (Madhu Bhojwani), निखिल अडवाणी (Nikkhil Advani) निर्मित या सिनेमात जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) आणि अन्नू कपूर (Annu Kapoor) मुख्य भूमिकेत झळकतील.

ड्राय डेची रिलीज डेट

तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील डब आवृत्तींसह 22 डिसेंबर रोजी ड्राय डे वेबसिरीत भारतात आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राईम व्हीडिओवर ड्राय डेचा प्रीमियर होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT