Jitendra Kumar to feature in Gurvinder Singh's anthology : ज्यांनी पंचायत, कोटा फॅक्टरी या सीरिज पाहिल्या असतील त्यांना सचिवजी अन् जितुभैय्याची भूमिका साकारणारा जितेंद्र कुमार कोण आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यानं या दोन्ही सीरिजमधून प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली. एकीकडे पंचायतचा तिसरा सीझन येण्याच्या बातम्यांना उधाण आले असताना दुसरीकडे त्याच्या नव्या चित्रपटाविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र कुमारच्या नव्या मालिकेच्या पुढील सीझनविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यात पंचायत नावाच्या मालिकेचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. आता त्याची लंतराणी नावाचा चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तो झी ५ नावाच्या ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Jitendra Kumar to feature in Gurvinder Singh's anthology film 'Lantrani'
प्रसिद्ध दिग्दर्शक गुरविंदर सिंग हे लंतराणी नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे. ही एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित हा चित्रपट जितेंद्र कुमारसाठी मोठी संधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांना आणि वेबमालिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात नावं सांगायची झाल्यास कोटा फॅक्टरी, आणि पंचायत या मालिकेचा उल्लेख करता येईल.
पंचायतमध्ये जितेंद्रनं फुलेरा गावच्या सचिवजींची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेचे जोरदार स्वागत झाले होते. नेटकऱ्यांनी जितेंद्रचे खूप कौतुकही केले होते. या सगळ्यात त्याच्या आगामी लंतराणी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यात तो एका वेगळ्या आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर देखील एका वेगळ्या रोलमध्ये दिसणार आहे.
लंतराणी ही तीन लघुपटांची मालिका आहे. त्यात तीन दिग्दर्शक आपल्या वेगवेगळ्या कलाकृती सादर करणार आहे. जॉनी लिव्हर आणि जितेंद्र कुमार हे नॅशनल पुरस्कार विजेते गुरविंदर सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. जितेंद्रनं याविषयी त्याच्या इंस्टावरुन चाहत्यांसाठी एक खास पोस्टही शेयर केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.