Jogira Sara Ra Ra Review in Hindi by Pankaj Shukla Nawazuddin Siddiqui : नवाझुद्दीन सिद्धीकीची गोष्टच वेगळी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांची चर्चा होती. आता त्याचा जोगिरा सारा रा रा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र त्यावरुन चाहत्यांची, प्रेक्षकांची निराशा झाली आहे. प्रेक्षकांनी त्यावर कडाडून टीका केली आहे. जोगिरा सारा रा रा हा नवाझुद्दीनचा आतापर्यतचा सगळ्यात निराशाजनक चित्रपट म्हणता येईल.
चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हापासून त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होताना दिसत आहे. नवाझुद्दीन सिद्धिकी, मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती उर्फ मिमोह आणि नेहा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. मात्र नवाझुद्दीन सारख्या दमदार अभिनेत्याचा समावेश असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा भावलेला दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन हा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला होता. त्यामुळे त्याच्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना खूप साऱ्या अपेक्षाही होत्या. मात्र जोगिरा सारा रा रा नं प्रेक्षकांची निराशा केली आहे.
Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!
येत्या काळात नवाझुद्दीनच्या वेगवेगळ्या विषयांवरील फिल्म्स प्रदर्शनासाठी तयार आहेत. मात्र त्यात जर जोगिरा सारा रा रा सारखे चित्रपट असल्यास प्रेक्षकांना त्याचे चित्रपट थिएटमध्ये पाहायला जावं की नाही असा चाहते नक्कीच विचार करतील.
यापूर्वी देखील नवाझुद्दीननं काही चित्रपटांतून कॉमेडियनची भूमिका साकारली होती. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र ज्याप्रकारच्या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. त्यामुळे त्याच्याकडून चाहत्यांना जास्त अपेक्षा असतात.
जोगिरा सारा रा रा मध्ये चाहत्यांना नवाझुद्दीननं बऱ्यापैकी निराश केले आहे. रटाळवाणी कथा, चित्रपटाचा मंदावलेला वेग आणि बळजबरीनं प्रेक्षकांना केलेला हसवण्याचा प्रयत्न यामुळे जोगिरा सारा रा खूप निराशा करतो. त्याचा प्रभाव जाणवत नाही. केवळ नवाझुद्दीनचा चित्रपट म्हणून तुम्ही जर तो पाहायला जाणार असाल तर तो ओटीटीवर येण्याची वाट पाहा हे सांगावे लागेल.
या चित्रपटाची मुळ कथा गालिब असद भोपाली यांची आहे. त्यात केलेला बदल हा फारसा प्रभावी नाही. जोगिरा सारा मध्ये नवाझुद्दीन हा जोगी प्रताप झाला आहे. जो लग्न जमवण्याचे काम करतो. अशातच एका मुलीची आणि त्याची भेट होते. त्याच मुलीचं लग्न जमवण्याचे कामही त्याच्याकडे येते. अशातच काय होते हे पाहणे महत्वाचे ठरते.
नवाझुद्दीनच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र दिग्दर्शकाची चित्रपटामधील पकड सुटलेली दिसते. कुषान नंदी आणि नवाझुद्दीन सिद्धिकी यांच्या टीमनं बाबू मोशाय बंदूकबाज नावाची फिल्म केली होती. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.
-----------------------------------------------------------------------------------
चित्रपटाचे नाव - जोगिरा सारा रा रा
लेखक - गालिब असद भोपाली
दिग्दर्शक - नईम सिद्धिकी, किरण श्रॉफ
रेटिंग - दोन स्टार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.