johnny lever work with son jesse lever in aflatoon marathi movie  SAKAL
मनोरंजन

Johnny Lever: जॉनी लिव्हरचा मुलासोबत पहिल्यांदाच अभिनय, या मराठी सिनेमात झळकणार

कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर, आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे.

Devendra Jadhav

Johnny Lever work with Son News: चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे.

कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर, आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे.

लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी वडील आणि मुलाला एकत्र आणण्याची किमया केली आहे. 'अ डिफेक्टीव्ह कॅामेडी.

साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.

(johnny lever work with son jesse lever in aflatoon marathi movie )

जॉनी लिव्हर यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. आता ‘अफलातून’ च्या माध्यमातून आपल्या मुलासोबत ते एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत.

विशेष म्हणजे या चित्रपटातही ते दोघे वडील आणि मुलाच्याच भूमिकेत दिसणार आहेत. यात जॉनी लिव्हर 'नवाब साहब' च्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या मुलाची 'आफताब’ची भूमिका जेसी लिव्हरने साकारली आहे.

‘अफलातून’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आम्हांला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं दोघेही सांगतात.

या दोघांसोबत ‘अफलातून’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी आहे. चित्रपटाचा धमाल टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे.

संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे.

वेशभूषा मीनल डबराल गज्जर हिची असून कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए .ए फिल्म्स ने सांभाळली आहे. ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack: 9 वर्षाची सर्वात लहान साक्षीदार... कसाबच्या विरोधात कोर्टात दिली होती साक्ष! कोण आहे ती मुलगी

Weather today : राज्यात गारठा वाढला, किमान तापमान 9.6 अंशांवर, उत्तरेतील थंडीच्या लाटेमुळे पारा आणखी घसरणार

Shaktikanta Das: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती खालावली, चेन्नईच्या रुग्णालयात दाखल

Share Market Opening: भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; बँकिंग-आयटी शेअर्समध्ये जोरदार वाढ

PAN 2.0 Project: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड देणार

SCROLL FOR NEXT