Jubin Nautiyal Latest News सोशल मीडियावर दररोज सेलिब्रिटींबद्दल काहीतरी ट्रेंड होते. #ArrestJubinNautyal शनिवारी ट्विटरवर ट्रेंड करीत होता. रातोरात असे काय घडले की सोशल मीडियावर जुबिन नौटियालला (Jubin Nautiyal) अटक करण्याची मागणी लोकांनी सुरू केली. युजर्सच्या संतापाचे कारण होते जुबिन नौटियालच्या आगामी कॉन्सर्टचे पोस्टर. पोस्टरवर एवढा गदारोळ का झाला? याबद्दलही बोलू. परंतु, त्याआधी जुबिन नौटियालने कॉन्सर्ट रद्द करण्याच्या अफवेवर काय म्हटले ते जाणून घेऊया.
अलीकडेच जुबिन नौटियालच्या (Jubin Nautiyal) कॉन्सर्टचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. पोस्टरबाबत दावा करण्यात आला होता की, शो चा आयोजक भारतातील वाँटेड गुन्हेगार जय सिंग आहे. हा व्यक्ती जय सिंग नसून रेहान सिद्दीकी असल्याचेही युजर्सने सांगितले. काही युजर्सने जय सिंगवर खलिस्तानचे समर्थन केल्याचा आरोपही केला.
या सगळ्या गोंधळानंतर जुबिन नौटियालचा अमेरिका-कॅनडा दौरा रद्द झाल्याचे बोलले गेले. मात्र, हे खर नाही. सत्य हे आहे की, जुबिन नौटियालचा अमेरिका दौरा आता नाही तर फार पूर्वी रद्द झाला होता. सिंगरच्या व्यवस्थापकाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून टूर रद्द केल्याची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर अफवा पसरल्यानंतर जुबिन नौटियालने ट्विट केले आहे. ‘नमस्कार मित्रांनो आणि ट्विटर परिवार. पुढील महिन्यात मी प्रवास आणि शूटिंगमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांमुळे खचून जाऊ नका. मला देशावर प्रेम आहे. मी तुझ्याच्यावरही प्रेम करतो’ असे नौटियालने ट्विटमध्ये लिहिले आहे.
जुबिनचा कॉन्सर्ट होईल!
जुबिन नौटियालचे हे ट्विट त्याला देशद्रोही म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर आहे. यासोबतच चाहत्यांनी टेन्शन घेण्याची गरज नसल्याचेही जुबिनने ट्विटवरून सांगितले आहे. जुबिनचा कॉन्सर्ट होईल. परंतु, तो आता व्यस्त आहे. याच कारणामुळे त्याने आधीच कॉन्सर्ट रद्द केला होता.
चाहत्यांना थोडा दिलासा
या ट्रेंडमध्ये युजर्सनी केवळ जुबिन नौटियालचे नावच ओढले नाही तर अरिजित सिंगलाही टार्गेट केले. अरिजीतने जय सिंग नावाच्या व्यक्तीसोबत कॉन्सर्ट केला आहे. मात्र, आजतागायत काहीही सांगितले नाही, असे युजर्सचे म्हणणे आहे. जुबिन नौटियालचे हे ट्विट पाहिल्यानंतर चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला असेल, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.