मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला bollywood actress juhi chawala ही आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं 5 जी 5g नेटवर्कच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर न्यायालयानं तिलाच फटकारत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या विरोधात तिची कानउघाडणी केली होती. आता त्यावरुन जुहीला ट्रोल केलं जात आहे. यामुळे संतापलेल्या अभिनेत्रींनं त्या ट्रोलर्सला जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. तिनं त्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. जुहीनं केलेल्या याचिकेवरुन ती सोशल मीडियावर social media चर्चेत आली होती.
देशात 5 जी नेटवर्क सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावरुन जुहीनं त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. 5 जी मुळे व्यक्ती आणि प्राण्यांच्या जीवाला धोका असल्याचे तिनं म्हटलं होतं. तिच्या त्या याचिकेवर न्यायालयात सुनावणीही झाली. मात्र जुहीनं ती सुनावणी ऑनलाईन online viral व्हायरल केल्यानं न्यायालयानं तिला खडसावले आणि तिला दंडही ठोठावला. जुहीनं तो दंड भरण्यास नकार देत त्या निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरणही सोशल मीडियावर खूप गाजले. त्याची चर्चा झाली होती.
आता जुहीनं तिची याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे तिला लोकांनी केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी अशा प्रकारे याचिका दाखल केली होती का, असा सवाल केला आहे. त्यामुळे जुही संतापली आहे. आणि तिनं ज्यांनी ट्रोल केलं त्यांना उत्तरं द्यायला सुरुवातही केली आहे. जुहीनं एक व्हिडिओ सोशल मी़डियावर शेयर केला आहे. त्यात तिनं आपली बाजु मांडली आहे. तिचा तो व्हिडिओ 14 मिनिटांचा आहे. त्यात ती 5 जी नेटवर्क आणि त्याचे फायदे तोटे यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तेव्हा ती ट्रोलर्सला सांगते की, तुम्ही ठरवायचे नाही की मी जे केलं तो पब्लिसिटी स्टंट होता की नव्हता.
जुहीनं सांगितलं आपण दाद मागण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. भविष्य़ात जे नेटवर्क आपल्याकडे येणार आहे ते आपल्यासाठी फायद्याचे आहे किंवा नाही याविषयी आपल्याला न्यायालयासमोर काही मुद्दे मांडायचे होते. त्यासाठी आपण याचिका केली. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि प्राणी यांच्यावर त्या नेटवर्कचा गंभीर परिणाम होणार असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे आपण न्यायालयात धाव घेतल्यचं तिचं म्हणणं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.