Justin Bieber Cancelled world tour esakal
मनोरंजन

Justin Bieber: भारतीयांच्या उत्साहावर पाणी; प्रकृती बिघडल्याने जस्टिन बीबरची वल्ड टूर कँसल

जस्टिन बीबरने केलेल्या घोषणेनंतर आता त्याच्या भारतात होणाऱ्या शोबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध हॉलिवुड गायक जस्टिन बीबरच्या शोची चर्चा जगभरात असते. मोठमोठ्या हॉलीवूडच्या सेलिब्रेटींपेक्षा त्याची (Social Media Post Viral) लोकप्रियता अधिक आहे. बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. काही काळापूर्वी गायक रामसे हंट सिंड्रोमने (Ramsay Hunt Syndrome) ग्रस्त होता. त्यानंतर त्याने आपल्या ‘जस्टिस’ या अल्बमसाठी ‘वर्ल्ड टूर’ची घोषणा केली होती. आता मात्र त्याच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड आल्याने जस्टिन बीबरने त्याचा दौरा पुढे ढकलला आहे.

जस्टिन बीबरचे युरोप आणि ब्राझीलमध्ये जवळपास सहा लाईव्ह शो झाले. यानंतर नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वर्षाच्या सुरूवातीला मी रामसे सिंड्रोम या आजाराशी लढत होते असे त्याने सांगितले. या आजारात जस्टिनला त्याच्या चेहऱ्याच्या समस्या उद्भवल्या होत्या. त्यामुळे जस्टिन उत्तर अमेरिकेची टूर पूर्ण करू शकला नाही. विश्रांतीनंतर तो युरोपच्या दौऱ्यावर गेला होता. जेथे त्याने त्याचे सहा लाईव्ह शो पूर्ण केले. मात्र परत एकदा प्रकृतीत बिघाड आल्याने आता आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मला काही वेळ हवा आहे. मी लवकरच बरा होणार असून तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी धन्यावाद असेही त्याने या पोस्टमध्ये लिहीले आहे. जस्टिन १८ ऑक्टोबरला भारतात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये परफॉर्म करणार आहे. मात्र जस्टिनच्या या घोषणेनंतर भारतातील शोबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT