Shefali Jariwala  Instagram
मनोरंजन

'काटा लगा' फेम शेफालीने एअरपोर्टवर केला लिपलॉक; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी शेफालीला केलं ट्रोल

स्वाती वेमूल

'काटा लगा' या एका गाण्यामुळे अभिनेत्री शेफाली जरीवालाला (Shefali Jariwala) प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून ती विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. शेफालीने 'बिग बॉस १३'मध्येही हजेरी लावली होती. त्यावेळीही ती चर्चेत आली होती. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. शेफालीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ती न्यूयॉर्कला रवाना होत होती. विमानतळावर तिला सोडण्यासाठी पती पराग त्यागी (Parag Tyagi)आला होता. एअरपोर्टबाहेरील पापाराझींसाठी पोझ दिल्यानंतर शेफालीने परागसोबत लिपलॉक केला. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

परागला निरोप देताना तिने एअरपोर्टवरच त्याला किस केलं. शेफालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 'कोरोनाच्या नियमांचा विसर पडला की काय', असं एकाने लिहिलं. तर 'सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रिटींनी असं वागू नये', असं दुसऱ्याने म्हटलं.

शेफाली आणि परागने २०१४ मध्ये लग्न केलं. 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोच्या पाचव्या पर्वात ही जोडी झळकली होती. परागसुद्धा अभिनेता असून त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शेफालीने सलमान खान, अक्षय कुमारसोबत 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात भूमिका साकारली होती. शेफालीने २००४ मध्ये संगीतकार हरमीत सिंगशी लग्नगाठ बांधली होती. मात्र २००९ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१४ मध्ये तिने परागशी लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT