kajol 
मनोरंजन

व्हिडिओ: 'त्रिभंगा'मध्ये काजोलचा पॉवरफुल लूक, टिझर रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री काजोलच्या आगामी 'त्रिभंगा' सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. काजोलने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन 'त्रिभंगा'चा टीजर शेअर केला आहे. यामध्ये काजोलचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. या टिझरमध्ये काजोलचा पॉवरफुल लूक दिसून येतोय आणि तिच्या चाहत्यांना देखील तो पसंत पडतोय. टीझर शेअर करण्यासोबतंच काजोलने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित केली आहे. 

खास गोष्ट अशी की या सिनेमाचं दिग्दर्शन काजोलचा पती आणि प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या प्रोडक्शन हाऊसने केलं आहे. या सिनेमाची कथा अभिनेत्री रेणुका शहाणेने लिहिली आहे आणि सिनेमाचं दिग्दर्शन देखील रेणुकाच करत आहे. काजोलसोबतंच या सिनेमात तन्वी आजमी, मिथिला पालकर देखील दिसून येईल. काजोलने घोषित केल्याप्रमाणे १५ जानेवारी रोजी हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.

हा एक स्त्रीप्रधान सिनेमा आहे. या सिनेमाची खास गोष्ट अशी की सिनेमात एकाच कुटुंबातील तीन महिलांची कथा दाखवण्यात येईल.सिनेमातील तीनही मुख्य पात्रातील महिला ज्यांची स्वतःची काही स्वप्न आहेत आणि वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगण्याची इच्छी आहे. यांच्यामध्ये मतभेद देखील आहेत. याचभोवती सिनेमाची कथा फिरेल. काजोल सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काजोल शेवटची 'तानाजी: द अनसंग वॉरिअर' या सिनेमात पती अजय देवगणसोबत दिसली होती. हा सिनेमा त्या वर्षातला सगळ्यात हिट सिनेमा होता. प्रेक्षकांना हा सिनेमा खूप आवडला होता त्यामुळे बॉक्स ऑफीसवर देखील त्याने चांगलीच कमाई केली होती.   

kajol new movie tribhanga teaser released set for 15 january 2021 premiere  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT