Kajol statment Controversy modi bhakt are upset. says thackeray group mp priyanka chaturvedi  SAKAL
मनोरंजन

Kajol Controversy: भक्त नाराज झालेत.. काजोलच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींचं परखड विधान

अशातच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीने काजोलचा चांगलाच समाचार घेतला

Devendra Jadhav

Kajol Controversy Statement News: बॉलीवूड अभिनेत्री काजोलने एका मुलाखतीत आपल्याकडील राजकारण्यांचं कमी शिक्षण आणि त्यांच्या दूरदृष्टीवर सवाल उपस्थित केले होते. देशातील राजकारणावर केलेल्या विधानामुळं मोठं वादंग माजलं आहे.

कमी शिकलेले लोक देश चालवत आहेत, अशा आशयाचं विधान तिनं केल्यानं मोठ्या ट्रोलिंगला तिला समोरं जावं लागलं आहे.

अशातच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीने काजोलचा चांगलाच समाचार घेतला. प्रियंका यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत काजोलच्या विधानाचा समाचार घेतलाय.

(Kajol statment Controversy modi bhakt are upset. says thackeray group mp priyanka chaturvedi)

प्रियंका यांनी ट्विट करुन लिहीलंय की, तर काजोल म्हणते की, आमच्यावर अशिक्षित आणि दूरदृष्टी नसलेल्या नेत्यांनीच शासन केले आहे.

काजोलच्या या विधानावर कोणीही नाराज नाही कारण तिचे मत योग्य नाही आणि तिने कोणाचे नावही घेतले नाही. परंतु सर्व भक्त नाराज आहेत. कृपया तुमचे संपूर्ण राजकीय ज्ञान उघड करु नका. असं ट्विट प्रियंकाने केलंय.

काय म्हणाली होती काजोल?

एका वेबसाईटला मुलाखत देताना काजोल म्हणाली, "बदल, विशेषतः आपल्या भारतासारख्या देशात खूपच हळूवारपणे सुरु आहे. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडकून पडलो आहोत. याचं कारण शिक्षणातही आहे.

आपल्याजवळ असे राजकीय नेते आहेत ज्यांना चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. यांपैकी अनेक नेत्यांजवळ तर दूरदृष्टीचं नाही, मला वाटतं ही दूरदृष्टी तुमच्यात शिक्षणामुळं येते. शिक्षणच तुम्हाला विविध कोनांतुन पाहण्याची संधी देते"


काजोलचं स्पष्टीकरण

"मी केवळ शिक्षण आणि त्याच्या महत्वावर बोलत होते. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याला अपमानित करणं आजिबात नव्हतं. आपल्याकडं काही जबरदस्त राजकीय नेते आहेत जे आपल्या देशाला योग्य मार्गानं नेत आहेत"

काजोल सध्या आपली वेबसीरिज 'द ट्रायल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अमेरिकन शो 'द गुड वाईफ'चं ही वेब सीरिज हिंदी अॅडेप्टेशन आहे. नुकतीच काजोलची लस्ट स्टोरीज 2 ही वेब सीरिजही प्रदर्शित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT