चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार असतात, जे एखाद-दुसऱ्या चित्रपटानंतर अचानक इंडस्ट्रीपासून दूर निघून जातात. मात्र त्या एखाद-दुसऱ्या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळालेली असते. अशीच एक कलाकार आहे, ती म्हणजे झनक शुक्ला. झनकने ९०च्या दशकात 'करीश्मा का करीश्मा' या टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर झनकने शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांच्या 'कल हो ना हो' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. आता झनक या लाइमलाइटपासून प्रचंड दूर आहे. झनक आता अभिनय किंवा चित्रपटसृष्टीशी निगडीत कोणतंच काम करत नाही. ती सध्या पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करून त्यातच पुढे करिअर करायची तिची इच्छा आहे.
झनकने 'कल हो ना हो'मध्ये जियाची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने इरफान खानसोबत 'डेडलाइन' या चित्रपटातही काम केलंय. बालकलाकार असताना भरपूर प्रसिद्धी मिळवलेली झनक आता मोठी झाली आहे. तिचे आताचे फोटो पाहून तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही. झनकचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये ती तिच्या बदललेल्या आयुष्याविषयी बोलताना दिसतेय. "मी वयाच्या २५व्या वर्षीच निवृत्त झाले, असं माझे आई-बाबा म्हणतात. सुरुवातील मी खूप बोलकी होते. पण आता त्याउलट मी खूप शांत झाले आहे. लहानपणी मी खूप काम केलंय. त्यामुळे आता मला माझं आयुष्य माझ्या परीने जगायचं आहे. मी आराम करते, साबणं बनवायला शिकतेय, मी फिरते आणि कधीकधी लिखाणसुद्धा करते", असं ती सांगते.
"मी अभिनयाला कंटाळले नाही. पण माझ्या बालपणातील बराच वेळ हा कामात गेलाय. त्यामुळे मला त्याचा आनंद घेताच आला नाही. तू आता ब्रेक घे, असं माझे आईवडील सांगतात. त्यामुळे मी सध्या शिक्षणावर माझं लक्ष केंद्रीत करतेय. सध्या मी काही कमवत जरी नसले तरी मी खूप समाधानी आहे. मी जेव्हा लहान होते, तेव्हा मी विचार करायचे की २४ वर्षांचे झाल्यावर मी खूप पैसे कमवेन, लग्न करेन आणि खूश राहीन. आता मी २५ वर्षांचे झाले आहे आणि काहीच कमवत नाहीये. पण माझे आईवडील मला खूप साथ देतात", असं ती या व्हिडीओत म्हणते. झनक ही अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे. वयाच्या सातव्या वर्षी तिने पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपटात काम केलं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला 'कल हो ना हो' हा तो चित्रपट होता. याशिवाय तिने सोन परी, हातिम यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.