अभिनेता कमल हासननं(Kamal Haasan) कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma) च्या शो (Show) मध्ये नुकतीच हजेरी लावली होती. नेहमीप्रमाणेच कपिलनं कमल हासन सोबत देखील खूप मजामस्तीचा आनंद घेतला. शो च्या दरम्यान कपिलने कमल हासनला त्याच्या दाढीवरुन 'फुल स्लीव की दाढी' म्हणत चिडवलं. यावरनं मग कमल हासननं देखील एकदम सॉल्लिड अंदाजात प्रतिक्रिया दिली. आणि मग कपिल जे सारखं-सारखं माझ्या लहानपणी असं तुम्हाला पाहिलं,तसं तुम्हाला पाहिलं हे जे बोलत होता त्यावरनं देखील त्याला चांगलं मजेदार अंदाजात सुनावलं. सोनी टी.व्हीनं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यात कपिल आपल्या शो मध्ये कमल हासन यांचे स्वागत करीत आहे. कमल हासन आपला सिनेमा 'विक्रम'(Vikram) च्या रिलीज आधी कपिलच्या शो मध्ये गेस्ट म्हणून उपस्थित राहिले होते.
त्या व्हिडीओत कपिल शर्मानं कमल हासनला म्हटलंय,''सर तुम्ही १९८१ मध्ये 'एक दूजे के लिए' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण तुम्हाला माहित आहे का त्याच वर्षी अमृतसरमध्ये एका मुलाचा जन्म झाला होता?'' त्यानंतर कपिलने कमला हासनना म्हटलं,''खूप मजा येतेय तुम्हाला पाहिल्यावर. आधी तुम्हाला पाहिलं होतं तेव्हा फक्त तुमच्या मिशा होत्या,आज फुल स्लीव दाढी आहे''. कपिलच्या या बोलण्यावर कमल हासन मात्र खो-खो हसू लागला. त्यानंतर कपिल प्रेक्षकांकडे पाहत म्हणाला,''अप्पू राजा सिनेमात,कमल हासन यांनी बुटक्या माणसाची भूमिका केली होती. आम्ही लहानपणापासून हाच विचार करत होतो,हे कसं शक्य झालं?''
कपिलच्या या प्रश्नानंतर कमल हासननं कपिलला विचारलं,''तुला सारखं माझ्या लहानपणी,माझ्या लहानपणी म्हणून नेमकं काय सिद्ध करायचं आहे. सारखं काय तेच सुरू आहे तुझं. ते जरा सारखं बोलणं बंद कर''. यावर कपिलनं हसण्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणत उगाचच जोक मारुन परिस्थिती सांभाळली. त्यानंतर कपिल परत एका मुद्द्यावर पुन्हा म्हणाला,''मला अशा पद्धतीच्या भावनांविषयी काही माहित नव्हतं ,कारण त्यावेळी मी शाळेत होतो''. कमल हासन पुन्हा म्हणाले की, ''तु मला मी म्हातारा झालोय याची जाणीव करुन दिलीस. जर एकदा सांगितलंय असं बोलू नकोस तर मग काय चाललंय तुझं''. कपिल पटकन बाजू सावरत म्हणाला,''माफ करा सर, मी त्यावेळी शाळेचा मुख्याध्यापक होतो''.
यानंतर कमल हासनच्या एका मित्राचं स्वागत करताना कपिल म्हणाला,''तुम्ही कमल हासन यांना कधीपासून ओळखता?'' त्यावर तो मित्र म्हणाला,''कमीत कमी ५० वर्षांपासून मी ओळखतो कमलला''. तेव्हा कपिल म्हणाला, ''वा,५० वर्ष''. कमल हासन कपिललला चिढवत म्हणाले,''तेव्हा तू शाळेत होतास''. तर असा हा एकंदरीत संवाद होता. पण पुन्हा या शो च्या शूटिंग दरम्यान उपस्थित क्रु मेंबरना वाटलं की आता अक्षय कुमारप्रमाणे कमल हासनही कपिलमुळे शो वर राग काढत निघून जातायत की काय. अशई कुजबूज तेव्हा सुरू होती असं काही सुत्रांनी सांगितलं आहे.
कमल हासन 'विक्रम' सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहेत. या सिनेमात विजय सेतुपति आणि फहद फासिल देखील आहेत. लोकेश कनगराज दिग्दर्शित 'विक्रम' सिनेमाची निर्मिती राजकमल फिल्म्स इंटरनॅशनलची आहे. हा सिनेमा 3 जून,2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.