kamal rashid khan aka krk admitted in hospital after chest pain  
मनोरंजन

कोर्टाने न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर KRK रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

KRK Admitted in Hospital : चित्रपट अभिनेता राशिद खान उर्फ ​​केआरके, ज्याला आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अटकेनंतर केआरकेला पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले होते तेथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून मुंबईत आल्यावर केआरकेला सोमवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी KRK ला बोरिवली येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले आणि चौकशीसाठी त्याला 4 दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, KRK विरुद्ध 2020 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे) आणि 500 ​​(बदनामी केल्याबद्दल शिक्षा) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला होता. केआरकेविरोधात पहिले 'लूकआउट सर्क्युलर'ही जारी करण्यात आले होते.

मालाड पोलिसांनी केआरकेला 2020 च्या ट्विटच्या संदर्भात अटक केली होती. त्या ट्विटमध्ये केआरकेने लव्ह जिहादशी संबंधित मजकूर लिहिला आणि पोस्ट केला होता. केआरकेच्या वतीने आज त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला, ज्यावर आता 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT