Javed Akhtar Speaks On Kangana Ranaut Allegations : बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत यांच्यातील हाडवैर एव्हाना सगळ्यांना माहिती झाले आहे. कंगनाचं बॉलीवूडमध्ये कुणाशी पटतं असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणे कठीण आहे. Javed breaks silence on Kangana interview
बॉलीवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त बोलण्यात कंगनाचा हात कुणी धरणार नाही. तिला कोणत्याही विषयाचे वावडे नाही. राजकारणापासून समाजकारणापर्यत सारख्या वेगवेगळ्या विषयांवर वाट्टेल ते बोलून कंगनानं नेहमीच लक्ष वेधून घेतले आहे. आताही तिनं पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे. यावेळी तिला जावेद अख्तर यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ते तिच्यावर नाराज झाले आहेत.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
यापूर्वी कंगनानं सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांनी कंगनावर दावा दाखल केला होता. कंगनानं सुरुवातीच्या सुनावणीला कोर्टामध्ये हजेरी लावली नाही. त्यामुळे कोर्टानं हजर होण्यासाठी ताकीदही दिली होती. कंगनानं माफी मागावी अशी मागणी अख्तर यांनी कोर्टाकडे केली होती. हे प्रकरण काही शांत व्हायचे नाव घ्यायला तयार नव्हते. अशात कंगनानं पुन्हा एकदा तिखट वक्तव्य करुन वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचं झालं असं की, काल जावेद अख्तर हे अंधेरी कोर्टात कंगनानं दाखल केलेल्या याचिकेसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांनी कंगनानं त्यांच्यावर जे आरोप केले त्यावर सणकून उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, जून २०२०मध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर कंगनानं एका चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यात तिनं काही गंभीर वक्तव्यं केली होती. त्यामध्ये कंगनानं ऋतिक रोशन आणि अख्तर यांनी माफी मागावी असे म्हटले होते.
कंगना म्हणाली होती, एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. आणि म्हणाले, राकेश रोशन आणि त्यांचे कुटूंब मोठे आहे. तू जे काही बोलली आहेस त्यावरुन त्यांची माफी माग. तू जर माफी मागितली नाही तर तुला त्रास होईल. ते तुला तुरुंगात टाकायला कमी करणार नाही. ते मला खूप ओरडले देखील होते. मला खूप भीती वाटली होती. यावर अख्तर यांनी त्या आरोपांचे खंडन केले आहे.
अख्तर म्हणाले, कंगनान जे काही सांगितले ते खोटे आहे. ती खोटारडी आहे. त्या मुलाखतीमध्ये देखील जे सांगितले त्याला काही अर्थ नाही. यावर कोर्टानं देखील अख्तर यांना मार्च २०१६ मध्ये अख्तर यांच्या घरी झालेल्या मीटिंगकडे लक्ष वेधले आहे. त्यावर अख्तर यांनी कंगनाला त्या मीटिंगच्या अजेंड्याविषयी माहिती होते. त्याबद्दल मी तिला सांगितले देखील होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.