Kangana Ranaut - Pm Modi News: कंगना रणौत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. कंगना रणौत आगामी तेजस सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाच्या तेजस सिनेमाचा ट्रेलर नुकताच भेटीला आला.
कंगनाच्या तेजस सिनेमाच्या ट्रेलरला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली. अशातच कंगना तेजसच्या डायलॉगचं श्रेय मोदींना देणार का? अशा चर्चा सुरु झाल्यात.
कंगना रणौत तेजसच्या डायलॉगचं श्रेय मोदींना देणार?
तेजस ट्रेलरमधला एक डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा डायलॉग आहे, 'भारत को छेड़ोगे तो नहीं छोड़ेंगे।' टीझरमध्येही या ओळीचा वापर करण्यात आला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका यूजरने कंगनाला या संवादाचे श्रेय पीएम मोदींना देण्याचे सुचवले आहे. जाणून घेऊया याचे कारण...
एका यूजरने X वर पीएम मोदींचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात मोदी 'भारत कुणालाही चिडवत नाही, पण कुणी भारताला छेडले तर भारतही त्याला सोडत नाही' असे म्हणताना दिसत आहे.
कंगना रणौतच्या 'तेजस' मधील संवाद संवादात पंतप्रधान मोदी जे काही बोलले त्यात साम्य असल्यामुळे, युजर्सने कंगनाला संवाद लेखनाचे श्रेय पंतप्रधानांना देण्याचे सुचवले. यावर कंगनाने अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
युजर्सच्या पोस्टला रिट्विट करत अभिनेत्रीने लिहिले, "क्रेडिट निश्चितपणे देणं बनता है." या पोस्टवर यूजर्सकडून अनेक रंजक कमेंट येत आहेत. एका युजरने लिहिले की, 'पंतप्रधान ज्या स्टाईलने संवाद म्हणत होते त्याच स्टाईलमध्ये सिनेमात ठेवायला हवा होता, पण हरकत नाही,.' एका यूजरने लिहिले की, 'हे चुकीचे आहे. क्रिएटिव्हीटी कुठे आहे? आमच्या नेत्याचा संवाद अशा प्रकारे कॉपी करू नका." आता कंगना या संवादाचे श्रेय मोदींना देणार का हे पाहायचे आहे.
तेजस चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असणार आहे असं बोललं जात आहे. एका भारतीय गुप्तहेरला दहशतवाद्यांनी पकडल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. आपल्या माणसाला परत आण्यासाठी कंगना पुढाकार घेते. त्यानंतर कंगना अनेक अडथळ्यांचा सामना करताना दिसते.
RSVP निर्मित तेजसमध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. तेजस हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.