Kangana Ranaut At Trimbakeshwar Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut At Trimbakeshwar: कंगना पोहोचली नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला! महादेवाचा अभिषेक करुन शिवभक्तीत तल्लीन..

कंगनाने त्र्यंबकेश्वर येथील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Vaishali Patil

Kangana Ranaut visited Trimbakeshwar Temple: कंगना राणौत ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या चित्रपटांबरोबर तिच्या वक्तव्यासाठीही ओळखली जाते. कंगना जितकी बोल्ड आहे. तितकिच ती धार्मिक असल्याचंही सर्वांनाच माहित आहे. ती नेहमी देवभक्तीत लीन असते. ती नेहमी मंदिरांना भेटी देत असते.

ती अनेकदा मंदिरातही जाते. मंदिरातून तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. कंगनाने काही दिवसांपुर्वीच केदारनाथ मंदिरात जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेतले. आता पुन्हा तिने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थानाला भेट दिली. यावेळी ती महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली.

कंगनाने गुरुवारी संध्याकाळी त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत तिचे कुटुंबही होते. यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टकडून कंगनाचा सत्कार देखील करण्यात आला आहे.

कंगनाने त्र्यंबकेश्वर येथील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कंगना यावेळी सलवार सूटमध्ये दिसत आहे. तसेच तिचे कुटुंबीय देशील या फोटोंमध्ये दिसत आहेत.

कंगना रणौतने काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्यात तिने लिहिले आहे की, "आज त्र्यंबकेश्वरला भेट दिली." यानंतर तिचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत कंगना रणौत मंदिरात, नंतर कर्मचाऱ्यांसोबत मंदिराबाहेर आणि पुजाऱ्यांसोबत दिसत आहे. यावेळी कंगना पांरपारिक वेषात दिसली. तिने सलवार सूट परिधान केला होता आणि लोकांना तिचा लूक खूप आवडला होता.

कंगणाचं वर्कफ्रंट

कंगना सर्वेश मेवाडाच्या 'तेजस' चित्रपटाचा लूक रिलिज करण्यात आला आहे. त्याचबरोबर कंगना लवकरच चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे.

ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा हा पुढचा भाग असेल. कंगनाने नुकतेच 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर!

Latest Maharashtra News Updates : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 12 नोव्हेंबरपासून होणार सुरु

Narendra Modi: नरेंद्र मोदींची सभा वळवणार का विदर्भवासियांची मनं?

आजचे राशिभविष्य - 9 नोव्हेंबर 2024

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT