kangna 
मनोरंजन

घरातील साफ-सफाई करताना दिसलं कंगनाचं वॉर्डरोब कलेक्शन, शेकडो चपलांचे जोड पाहिलेत का?

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- २०२० हे वर्ष अनेकांसाठी अनलकी ठरलं. त्यामुळे हे वर्ष सरुन नवीन वर्षात नवी सुरुवात करण्यासाठी सगळ्यांची जोरदार तयारी केली. काही सेलिब्रिटी घरातंच सेलिब्रेशन करत आहेत तर काहींनी शहराच्या बाहेर जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करणं पसंत केलं आहे. मात्र यामध्ये एक नाव असं आहे जे पार्टी सोडून घरातील साफ सफाई करण्यात बिझी आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अभिनेत्री कंगना रनौत. कंगनाने वर्षाचा शेवटचा दिवस साफ सफाई करुन सेलिब्रेट केला आहे. 

काही सेलिब्रिटी जिथे वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुट्टी घेऊन एन्जॉय करत होते तिथे अभिनेत्री कंगना रनौत मात्र वॉर्डरॉब आणि घर चमकवण्याच्या मागे लागली आहे. कंगनाने तिचं वॉर्डरोब साफ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या शेकडो चपल्यांच्या जोड्यांमध्ये बसलेली दिसतेय.

कंगनाने तिचा हा फोटो ट्विट करत म्हटलंय, ''जेव्हापासून मी घरी परतली आहे तेव्हापासून साफ सफाई करत आहे. असं म्हणतात की ज्या वस्तु तुमच्या असतात त्यांचे तुम्ही देखील असतात. माझ्या सामानांची सतत सफाई केल्यामुळे मला असं जाणवतंय की जसं काय मी त्यांची गुलाम आहे. आशा आहे की आज माझं काम संपेल आणि २०२१ मध्ये मी क्वीनसारखी एंट्री घेईन.''

कंगना सध्या मुंबईत आहे. ती यावर्षी कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मनालीला गेली होती. मात्र आता ती नुकतीच परतली आहे. मुंबईत आल्यावर सगळ्यात आधी तिने सिद्धिविनायक आणि मुंबा देवीचं दर्शन घेतलं होतं. कंगनाच्या सिनेमांबाबत सांगायचं झालं तर ती लवकरंच धाकड या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. हे शूट जानेवारीमध्ये सुरु होईल. याव्यतिरिक्त कंगना रनौत थलायवी आणि तेजय या सिनेमांमध्ये दिसून येणार आहे.   

kangana ranaut cleaning her shoes on the last day of 2020 says hopefully i will be enter 2021 like a queen  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT